आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी दि .21 मे ते 31 मे दरम्यान समृद्ध शेतकरी अभियान

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कल्पनेतून सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी दि .21 मे ते 31 मे दरम्यान समृद्ध शेतकरी अभियान राबवण्यात येत आहे. भारत हा कृषिप्रधान देश असून

देशातील 80% पेक्षा अधिक लोक शेती व शेतीवर आधारीत व्यवसाय करतात. शेती हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा असल्यामुळे व्यवहाराचे अर्थशास्त्र शेतीवर अवलंबून आहे. शेतक-यांनो यंदाचा खरीप हंगाम हा लवकरच सुरू होणार असून हवामान विभागाच्या अंदाजानूसार यंदा मुबलक व वेळेवर पाऊस होणार आहे. शेतकऱ्यांच्या अर्थ कारणाची घडी बसवणारा महत्त्वाचा

हंगाम म्हणजे खरीप हंगाम होय‌. लातूर जिल्हा सोयाबिन उत्पादनात अग्रेसर असून निलंगा, देवणी, शिरूरअनंतपाळ सह जिल्ह्यात 80/शेतकरी सोयाबिनचा पेरा करतात आपल्या शेतकऱ्यांना सोयाबिन तूर उत्पादनाचे योग्य मार्गदर्शन नसल्याने इतर देशाच्या किंवा राज्याच्या तुलनेत अतिशय कमी उत्पादन प्रति एकरी उत्पन्न फक्त दहा ते बारा क्विंटल मिळत आहे.योग्य पध्दतीने जमिनीची

मशागत चांगल्या प्रतिचे बि-बियाणे खते औषध फवारणी व पाण्याचे नियोजन खुरपणी सुधारीत पध्दतीने वेळेत केल्यास उत्पादनात भरीव वाढ होऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊन शेतकऱ्यांची वाटचाल समृद्धीकडे होण्यासाठी सोयाबिन पेरणी, व्यवस्थापण, नियोजन कसे करावे यासंबंधी कृषी विद्यापिठाचे तज्ञ व कृषी विभाग यांचे योग्य मार्गदर्शन

प्रत्येक गावामध्ये शेतकरी बांधवांना व्हावे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना सोयाबिनचे उत्पन्न एकरी दहा ते बारा क्विंटल ऐवजी किमान वीस ते बावीस क्विंटल प्रति एकरी होईल, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबात चार पैसे अधिक मिळातील शेतकऱ्यांच्या कुटुंबात आर्थिक स्थैर्य व समृद्धी नांदेल अशी संकल्पना माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी मांडली आहे. त्यांच्या संकल्पनेमुळे

सोयाबिन तूर पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी यशस्वी पेरणीची अष्टसुञी समृद्ध शेतकरी अभियानातून प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जावून कृषी तज्ञाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.तरी सर्व शेतकऱ्यांनी समृद्धी शेतकरी अभियानात सहभागी व्हावे व सोयाबीन , तूर पिकाची उत्पादकता वाढवून शेतकरी समृद्ध अभियान यशस्वी करावे असे आवाहन निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ तालुका कृषी विभगामार्फत करण्यात आले आहे.

Recent Posts