महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रशांत साळुंके ) – नुकतेच लातूर येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख आले होते.यावेळी बाभळगाव निवासस्थानी विविध गावच्या सोसायटी निवडणुकीत विजयी झालेल्या नवनीर्वाचीत संचालक, पॅनल प्रमुख यांनी त्यांची भेट घेतली. पालकमंत्री देशमुख यांनी त्यांचे
अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
लातूर तालुक्यासह जिल्हयात विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकामध्ये विविध गावातील विजयी झालेल्या नुतन संचालक व पॅनल प्रमुखांनी बाभळगाव निवासस्थानी पालकमंत्री देशमुख यांची भेट घेतली. यामध्ये शिवनी (खु), काटगाव, खरोळा, मुरुड अकोला, भडी, कासारखेडा, सलगरा (खु), गातेगाव
येथील सोसायटी निवडणुकीतील पॅनल प्रमुख युवराज जाधव, संचालक यशवंत शिंदे, मधुकर हूगे, भानुदास कोतने, सोमनाथ ततापुरे, चंद्रकांत मोमणे, काटगाव, तांदुळवाडी, कृष्णा नगर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा ग्रुप सोसायटी पॅनल प्रमुख गोविंद बोराडे, संचालक भगवंत बोराडे, माणिक बोळे, युवराज धायगुडे, धोंडीराम कोद्रे, वसंत पवार, काकासाहेब बंडे, बालाजी चव्हाण,
रमाकांत राठोड आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, मारुती महाराज
सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शाम भोसले, नगरसेवक पप्पू देशमुख, नागसेन कामेगावकर, दत्ता सोमवंशी, कालिदास माने, प्रा.शिवाजी जवळगेकर, सायरा पठाण, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिठाराम राठोड, मोहन माने, खरोळा सरपंच धनंजय देशमुख, माधव गंभीरे, लातूर सोशल मीडिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, दगडू आप्पा मिटकरी, आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.