भाजपा लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांनी शेतकरी हितासाठी पुढाकार घ्यावा माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकरांच्या सुचना

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके) – मराठवाड्यात आजही शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी व त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरीता केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध उपाययोजना होत आहेत. मात्र सामाजिक बांधीलकी जोपासत भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी सुद्धा शेतकर्‍यांचे हित आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न

वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी सुचना देत निलंगा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन संवाद साधावा असे आवाहन केले.
खरीप हंगाम लवकरच होऊ घातलेला असून हवामान खात्याने मान्सून लवकर येण्याचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवरच शेतकर्‍यांनी खरीपाच्या पेरणीसाठी

तयारी सुरु केली असून या तयारीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि पर्यायी व्यवस्था देण्याकरीता भाजपा पदाधिकार्‍यांना सुचना देण्यासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या लोकप्रतिनिधी व भाजपा पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीवेळी प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांचीही उपस्थिती होती. शेतकर्‍यांच्या

हितासाठी केवळ आंदोलन करणे हेच भाजपा लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांचे काम नसून या शेतकर्‍यांना शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल यासाठी मार्गदर्शन करणे हे कर्तव्य असल्याचे सांगत माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी प्रत्येक लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांनी आपआपल्या भागातील शेतकर्‍यांशी संवाद साधावा अशी सुचना केली. या

संवादाच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी पेरणी कशी करावी, पिकपेरा कसा असावा, पेरणीसाठी कोणती बियाणे आणि खत वापरावेत याबाबत माहिती द्यावी असे सांगून समजा बियाणे व खतांचा तुटवडा झाल्यास पर्यायी व्यवस्था कोणती असावी याबाबतही शेतकर्‍यांना अवगत करावेत असे सांगितले. शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न वाढवेत याकरीता शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आता

काळाची गरज असल्याचे सांगत माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी याकरीता मतदारसंघातील तिन्ही तालुक्याच्या ठिकाणी लवकरच शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत दिली. या मेळाव्यासाठी राज्यातील प्रसिद्ध कृषीतंज्ञाना आमंत्रीत करण्यात येणार असून या मेळाव्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याचे

सांगितले. या मेळाव्याचा लाभ मतदारसंघातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांना व्हावा याकरीता लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांनी आपआपल्या भागात प्रवास करून शेतकर्‍यांशी याबाबत संवाद साधावा अशी सुचनाही माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी दिली. या मेळाव्याच्या पुर्व तयारीसाठी प्रशासनालाही सुचना देण्यात आले असून प्रशासनाला लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांची जोड

मिळाल्यास या मेळाव्यांचा अधिकाधिक लाभ शेतकर्‍यांना मिळणार आहे. त्यामुळे भाजपा लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांनी आगामी काळात शेतकरी हितासाठी पुढाकार घेऊन शेतकर्‍यांशी संवाद साधणे अपेक्षीत असल्याचे सांगितले. या बैठकीस जिल्हा संघटन सरचिटणीस तथा जि.प.चे माजी सभापती संजय दोरवे, जि.प. चे माजी कृषी सभापती गोविंद चिलकुरे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे आदींसह मतदारसंघातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent Posts