महाराष्ट्र

लातूर मनपा कडून पिवळे पाणी पुरवठा आणि सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या खासगीकराना विरुद्धलातूर भाजपाचे तीव्र आंदोलन

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर महानगरपालिके कडून लातूर शहराला गेल्या महिनाभरापासून होत असलेल्या दूषित पाणीपुरवठा बाबत सर्वात पाहिले प्रेरणा होनराव आणि नंतर अजित पाटील कव्हेकर यांनी आवाज उठवला होता. आणि आता लातूर भाजपा चे सर्व मोठे नेते एकत्र येऊन मनपा समोर हजारो पिवळ्या पाण्याच्या बाटल्या भरून आणून आणि त्याचे तोरण मनपाच्या गेटला बांधून

तीव्र निषेध आंदोलन केले. आंदोलन आवाज
उठवण्यासाठी भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. लातूरकरांना दूषित पाणीपुरवठा करून आरोग्याशी

खेळण्याचा प्रकार महापालिका प्रशासन आणि सत्ताधारीमागील एक महिन्यापासून करत आहे. गोरगरीब जनतेसाठी मोदी सरकारने सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल निर्माण केले परंतु त्याचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी आजच्या या आंदोलनात सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाला खासदार सुधाकर

शृंगारे , भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर व शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे ,संघटन सरचिटणीस मनीष बंडेवार ,शैलेश लाहोटी , गटनेते शैलेश गोजमगुंडे व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश सचिव तथा मीडिया पॅनलिस्ट प्रेरणा होनराव आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर इतर सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Most Popular

To Top