महाराष्ट्र

रुग्णांचा न्याय व हक्कासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिस संरक्षण द्यावे रुग्ण हक्क संरक्षण समितीची मागणी

महाराष्ट्र खाकी ( लातुर ) – आरोग्य क्षेत्रात रुग्णसेवार्थ रुग्णहितार्थ कार्य करणारे सामाजिक कार्यकर्त्यांना अनेक अडचनीचा सामना करावा लागतो अनेकदा रुग्णांचा न्याय व हक्कासाठी खाजगी शासकीय हॉस्पिटलमध्ये जावे लागते व माहिती घ्यावी लागते अनेक वेळा काही हॉस्पिटलचा गैरकारभाराबाबत आरोग्य प्रशासनाकडे तक्रारी करावे लागतात व पाठपुरावा करावा लागतो

डॉक्टरांना डॉक्टर संरक्षण कायद्या अंतर्गत कायदेशीर संरक्षणाचे कवच आहे शासकिय डॉक्टरांना शासकिय कामात अडथळा बाबत कायदेशीर प्रावधान आहे परंतु या कायद्याचा दुरुपयोग होऊन रुग्णहिताचा हक्कासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच निनावी धमक्याचे फोन करुन सामाजिक कार्यकर्त्यांचे मानसिक

खच्चीकरण करण्याचे प्रकार पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णहितार्थ कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते हे निपक्षपातीपणे कार्य करतात ते डॉक्टर व रुग्ण यात समन्वय साधुन रुग्णसेवेचे कार्य करत आहेत परंतु या रुग्ण हक्काचा कार्यामुळे काहिजनांना रुग्णांची फसवणूक करुन आर्थिक लुट करता येईना म्हणून ते खोटे गुन्ह्यात अडकिविण्याचे,शारीरिक इजा पोहोचवण्यासाठी हल्ला

करण्याचे षडयंत्र रचत आहेत अशि शंका आहे . रुग्ण हक्कासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्त्यांचा जिवीताला धोका आहे सामाजिक कार्यकर्त्यांना कायदेशीर संरक्षणाचे प्रावधान नाहीत म्हणून रुग्णांचा न्याय व हक्कासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिस संरक्षण द्यावे या मागणीचे निवेदन रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना

दिले यावेळी समिती प्रमुख ॲड.निलेश करमुडी, प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ, महिला अध्यक्षा रेणुकाताई बोरा, मराठवाडा अध्यक्षा पुजाताई निचळे, मराठवाडा संपर्कप्रमुख प्रा.शंकरराव सोनवणे, जिल्हाध्यक्ष दिपक गंगणे, महिला जिल्हाध्यक्षा कावेरी विभुते, जिल्हा सचिव बाबासाहेब बनसोडे,जिल्हाउपाध्यक्ष श्रीकृष्ण डाळे, विशाल होके,नंदगे,पोलदासे,होळकर आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Most Popular

To Top