महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील निटूर येथील पंचक्रोशीतील जागृृत देवस्थान श्री सादनाथ महाराज मंदिरात यंदा अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्याची सूरूवात दि. 26 ते 3 पर्यंत सुश्राव्य कीर्तनकाराच्या सानिध्यात चालू आहे.मंदिरात मध्यराञीपासून भाविक-भक्तांनी मोठ्यासंख्येने सपत्निक अभिषेक करण्यात आले.
ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी परराज्यातून भाविक-भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली.तसेच,गावातील अनेक महिला पहाटेपासून निटूरमोड येथून चालत येऊन दर्शन घेतले हे विशेष महत्त्व आहे.एक महिला भक्त दर्शनासाठी लोटांगण घालून दर्शनास येतात हे विशेष आहे श्रध्दास्थान आपल्या भक्तीनुसार श्रध्देचे खुप महत्त्व पंचक्रोशीतील
भाविक-भक्तांना असते.सोमवारी याञेचा दिवस असल्याने आदल्यादिवशी अनेक व्यापारी मुक्कामी येत असतात आणि दोन दिवस चालणार्या या याञेची उत्सुकता सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणात दिसून आले.अनेक बाल-गोपाळांसाठी रहाट-पाळणे,त्यांच्या खेळाचे विशेष करून या ठिकाणी सेवा दिली जात आहे. ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिराच्या विश्वस्त समितिने उत्तम
नियोजन करून भाविक-भक्तांसाठी रांगेतून दर्शनासाठी बांबूचा वापर करून आत आणि बाहेर अशा प्रकारे दिशादर्शक दाखवून सोय करण्यात आली होती.सोमवारी अभिषेक,ज्ञानेश्वरी पारायण आणि शिवकथेचे श्रवण करण्यात आले.मंगळवारी मंदिरातून सकाळी सात वाजता ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज यांची पालखी,श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी मिरवणूक काठण्यात येणार आहे.तसेच
ह.भ.प.एकनाथ महाराज लोमटे ( मलकापूर ) यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन,त्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद,तसेच जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. एकंदर,मंदिर परिसरातील सुशोभिकरणाने भाविक-भक्त याठिकाणी आल्यानंतर मंदिराची स्तुती आणि कौतुक होताना पाहावयास मिळत आहे हे सर्व श्रेय भक्ती तेथे श्रध्दा याप्रमाणे विश्वस्त समितीतील सदस्यांनी केल्याने आजतागायत हे रूपडे बदलले आहे.