महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील निटूर येथील जागृृृृत देवस्थान श्री सादनाथ महाराज मंदिरात यंदा अखंड हरिनाम व सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दि.26 ते 3 मे पर्यंत सप्ताहाच्या कालावधीमध्ये निटूर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस उपनिरिक्षक संदीप अन्येबोईनवाड यांनी दर्शन घेऊन मंदिराच्या सुशोभिकरणाचे कौतुक केले.
तसेच,मंदिर समितीच्या वतीने निटूरचे नवनियुक्त पोलीस उपनिरिक्षक संदीप अन्येबोईनवाड यांचा मंदिरामध्ये यथोचित जागृृृत देवस्थान श्री सादनाथ महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार प्रा.अनिल सोमवंशी,पंकज कुलकर्णी,विजयकुमार देशमुख,बाळकृृष्ण डांगे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.त्यांच्याशी अर्धा तास संवाद साधून मंदिराची माहिती सांगण्यात आली.
याप्रसंगी,निटूर पोलीस ठाण्याचे बिट अमलदार तपघाले,सहकारी पोलीस कर्मचारी,पञकार राजकुमार सोनी,पञकार प्रशांत साळुंके,पञकार नामदेव तेलंगे,निळकंठ गंगणे,महेश पाटील,प्रशांत निटूरे,नवनाथ बूडगे,अंकुश कवडे,राजकुमार मुचूटे,बालाजी गंगणे,वैजिनाथ करंजे आदी जणांची उपस्थिती होती.