लातूर जिल्हा

महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले

महाराष्ट्र खाकी (लातूर) – आज 1मे म्हणजे महाराष्ट्र दिन, सर्व महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा केला गेला. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने आज (दि.1 मे) रोजी लातूर शहर महानगरपालिका मुख्यालय येथे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी मानवंदना स्वीकारून समस्त लातूरकरांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्राने ज्या धैर्याने आणि सामर्थ्याने लढला, त्या गुणांचा स्वीकार करून प्रत्येक लढा कणखरपणे लढून विजयश्री संपादन करण्याचा संकल्प आजच्या या दिनी करूयात. हुतात्म्यांच्या प्राणांच्या आहुतीने हा संयुक्त महाराष्ट्र घडला त्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी वंदन ! असे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी प्रतिपादन केले

 

Most Popular

To Top