महाराष्ट्र

लातूर जिल्ह्यातील हत्तीबेट पर्यटन स्थळाचे संवर्धन करून विकास करण्याची आणि मंजूर सभागृहाचे बांधकाम बेटावर न करता खाली जमिनीवर करण्याची मागणी

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हत्तीबेट पर्यटन स्थळाचे संवर्धन करून त्याचा विकास करावा. हत्ती बेटावर मंजूर करण्यात आलेल्या सभागृहाचे बांधकाम बेटावर न करता बेडच्या खाली असलेल्या जमिनीवर करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद

केले आहे की लातूर जिल्ह्यातील पर्यटन वाढवण्यासाठी हत्तीबेट पर्यटन स्थळाचे संवर्धन करून योग्य विकास करणे आवश्यक आहे. हत्तीबेट हे महाराष्ट्रातील एक अद्भुत असे पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी डोंगराच्या मध्ये सुमारे पन्नास फुट खोलीवर पातळ लिंग नावाने महादेवाची लिंग आहे त्याचप्रमाणे साडेसहाशे मीटर पेक्षा अधिक( अर्धा किलो मीटर पेक्षा जास्त ) असणारी गुहा या ठिकाणी

असून सध्या ही दोन्ही ठिकाणे पर्यटकांसाठी बंद आहेत. महाराष्ट्रामध्ये असे अद्भुत ठिकाण दुसरे नसावे त्यामुळ तातडीने पुरातत्व विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही दोन्ही ठिकाणी पर्यटनासाठी सुरू करावीत व त्यांचे संवर्धन करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हत्ती बेटा साठी पर्यटन विभागाच्यावतीने साडेतीन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे मात्र या

निधीमधून बेटावर सभागृह बांधकाम करण्यात येऊ नये त्यामुळे बेटावरील नैसर्गिक आदिवास नष्ट होणार असून जी काही बांधकामे करायचे आहेत ते बेटाच्या खाली असलेल्या जमिनीवर करण्यात यावे आणि बेटाच्या संवर्धन करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर अभय मिरजकर, सुपर्ण जगताप, दिपरत्न

निलंगेकर, डॉक्टर बी. आर. पाटील, शिवशंकर चापुले, पंकज जैस्वाल, शंकर गुट्टे, ऋषीकेश दरेकर यांची नावे व स्वाक्षरी आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

Most Popular

To Top