महाराष्ट्र खाकी (औसा / प्रशांत साळुंके) – या दोन वर्षांत औसा विधानसभा मतदारसंघात 134 सोयाबीन बनीम जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतरस्ते नसल्याने वेळीत शेतकऱ्यांना राशी करता येत नसल्याने या घटना घडत असल्याचे आपल्या लक्षात आले शेतकऱ्यांचे हे दु:ख आपण जवळून बघितले.यामुळेच शेतरस्ते हे अभियान हाती घेण्यात आले. शेतरस्ते हाच शेतकऱ्यांच्या प्रगतीचा
मार्ग आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नकाशावरील शेतरस्ते मोकळे करताना आडवाआडवी करुन प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावू नका या अभियानाला शेतकऱ्यांनी सहकार्य करावे अशी विनंती आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे. दि.26 एप्रिल रोजी मनरेगातून ग्रामसमृद्धी या अभियाना निमित्त निलंगा तालुक्यातील कोराळी व कासारसिरसी वाडीतयेथील शेतकऱ्यांशी
संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी भास्कर पाटील, परमेश्वर बिराजदार, गोरख होळकुंदे, जिलानी बागवान, धोंडीराम बिराजदार,कोराळी सरपंच विक्रम बिराजदार, उपसरपंच संजय ममाळे,कासारसिरसी वाडीचे सरपंच गुरुनाथ पंदले, काशीनाथ पोगले, वामनराव आकडे, चंद्रशेखर पाटील, सुग्रीव आकडे, वैभव आकडे, अविनाश स्वामी, रायप्पा ईश्वर, कस्तुर जाणकर, आदीसह ग्रामस्थ
उपस्थित होते. नकाशावरील सर्व शेतरस्ते हे शासनाच्या मालकीचे आहेत माझ्या मागणीवरून लातूरचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रशासन हे शेतरस्ते मोकळे करीत आहेत. हे करीत असताना शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतरस्ते करुन
घ्यावेत या अभियानाला लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे. शेतरस्ते झाल्यास सध्याच्या तरुण पिढीला शेतीपूरक व्यवसाय उभे करता येतील केवळ शेतरस्ते नसल्याने या पिढीला शेतीपूरक व्यवसाय करता येत नाहीत. गतवर्षी पासून सुरू असलेल्या या अभियानामुळे मतदारसंघात आठशे किलोमीटरचे शेतरस्ते तयार झाले आहेत. शेतकरी व प्रशासनाच्या
सहकार्याने या अभियानाला गती येत असून हे अभियान आता चळवळ बनली आहे असे सांगून आमदार अभिमन्यू पवार यांनी मनरेगा अंतर्गत योजनेतून गावाच्या विकासासोबत शेतकऱ्यांचा विकास होणार आहे. या योजना गेल्या अनेक वर्षापासून आहेत मात्र राज्यकर्त्यांनी त्या सामान्य लोकांपर्यंत दिल्याच नाहीत. त्यामुळे या योजना केवळ कागदावरच राहिली.आपण या योजना
शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी हे अभियान हाती घेतले आहे.या योजनेतून शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधावी असे सांगून या अभियानात संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत आहेत. ज्या गावांमध्ये या अभियान दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थितीत राहून या योजनेची माहिती घ्यावी असे आवाहन यावेळी बोलताना आ. अभिमन्यू पवार यांनी केले आहे.