निटूर येथील पंचक्रोशीतील श्रध्दास्थान ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज समाधी मंदिराच्या प्रवेशव्दाराचे काम पूर्णत्वाकडे

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील निटूर येथील पंचक्रोशीतील श्रध्दास्थान ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज समाधी मंदिराच्या प्रवेशव्दाराचे काम पूर्णत्वाकडे आहे याचे काम सोलापूर येथील प्रसिध्द कारागिर प्रसाद चौधरी यांच्या कलाकूसरीतून प्रवेशव्दाराला रूप आणण्याचे काम त्यांनी श्रध्देनुसार केले आहे.मराठवाड्यातील पहिल्यांदाच या

कारागिराने प्रवेशव्दाराचे रूपडे बदलल्याचे दिसून येत आहे.या मनोर्‍याचे काम चौबाजूंनी करण्यात आले आहे विविध रंगांनी शेड व्हिथ गोल्ड कोटींगचे काम करण्यात आले आहे या मनोर्‍याच्या कामाची स्तूती सध्या निटूर व परिसरातील भाविक-भक्तांच्या आकर्षणाचा भाग ठरला आहे. आतील शिखरावर विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे.तसेच प्रवेशव्दाराच्या पूठील

भागातही विद्युत रोषणाईने मंदिर आकर्षक दिसत आहे.तसेच आतील भागात स्ट्रीट लाईटनेही आकर्षण वाढले आहे.आतील भागात स्वामी समर्थाच्या मूर्ती स्थापनेसाठी आकर्षक फर्शीव्दारे बांधकाम चालू आहे.प्रवेशव्दाराजवळील पूठील भागातही फर्शीचे काम सद्यस्थितीला चालू होणार आहे.गेल्या तीन वर्षापासून विश्वस्त समितीच्या अथक प्रयत्नांने मंदिरातील कामे हे

पूर्णत्याकडे चालले आहे आणखीन कामे शिल्लक आहेत.सुशोभिकरणाच्या कामात प्रा.अनिल
सोमवंशी,पंकज कुलकर्णी,विजयकुमार देशमूख,बाळकृृृष्ण डांगे,संजय कुलकर्णी,नवनाथ बूडगे,दिनकर निटूरे,वामन जाधव आदी मंदिर समितीतील सदस्यांचा मोठा हातभार आहे. अखंड हरिनाम व शिवकथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास दि. 26 ते 3 मे

पर्यंत मंदिरात नियौजनबध्द सप्ताह्याची सुरूवात होणार आहे अनेक सुश्राव्य कीर्तनकार व प्रसिध्द असे गायनकार असल्याने निटूर व परिसरातील भाविक-भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे,विश्वस्त समिती मंदिर व गांवकर्‍यांनी आवाहन केले आहे. सोलापूर येथील कारागिर प्रसाद चौधरी यांच्या या ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज समाधी मंदिराच्या प्रवेशव्दाराच्या कामामुळे त्यांचे सर्वञ कौतूक होताना दिसत आहे.

Recent Posts