महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – केळगाव ता. निलंगा येथील रब्बानी पांढरे ह्या एका मिस्री काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा तीन एकर ऊस शाॕटसर्कीटमुळे जळाला असून यामुळे त्यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. हा शेतकरी ट्वेंटीवन कारखाण्याचा सभासद आहे. मात्र उस लागवडीची नोंदच केली नसल्याने जळालेला ऊस जातो की नाही अशी धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे.
याबाबतची माहीती अशी की, सध्या कारखाने बंद होण्याच्या मार्गावर असून कारखाण्याने करार केलेल्या टोळ्याही परतीच्या मार्गावर निघत आहेत. तालुक्यात अजूनही विविध कारखाण्याचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस फडात उभाच आहे. केळगाव ता. निलंगा येथील रब्बानी पांढरे या शेतकऱ्यांनी मार्च मध्ये 86032 या जातीच्या ऊसाची लागवड केली असून बारा महीने
उलटून गेले आहेत. शेतातील विद्युत मोटारीसाठी टाकलेल्या वायरचे बस्ट होऊन ऊसने पेठ घेतला यामुळे त्यांचा तीन एकर ऊस जळाला आहे. हा शेतकरी ट्वेंटीवन कारखाण्याचा सभासद आहे. मात्र ऊस लागवडीची नोंद कारखाण्याकडे केली नाही त्यामुळे ऊस जाईल की नाही अशी धास्ती या शेतकऱ्यांनी घेतली आहे. हा शेतकरी
मिस्री काम करतो त्यामुळे त्यांच्यावर मोठे अर्थिक संकट कोसळले आहे. याबाबत कृषी व तहसील विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.