देश

लातूरचे मा.खा.डॉ.सुनील गायकवाड यांना ” मानवाधिकार रत्न” पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र खाकी ( नवी दिल्ली ) – नवी दिल्ली येथील मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट च्या वतीने लातूरचे लोकप्रिय संसदरत्न माजी खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना “मानवाधिकार रत्न पुरस्कार” जाहीर झाला आहे. मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट नवी दिल्ली, च्या वतीने 10 मे 2022 रोजी राष्ट्रीय कार्यकर्ता संमेलन आणि प्रतिभा सन्मान कार्यक्रम मध्ये या

संस्थेचे अध्यक्ष दिनेश रमाशंकर गुप्ता यांनी डॉ. सुनील गायकवाड यांना लेखी पत्राद्वारे ” मानवाधिकार रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच या पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून ही डॉ. सुनिल गायकवाड यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मानवाधिकार ही संस्था संपूर्ण भारतामध्ये कार्यरत आहे. समाजहिताच्या

कामासाठी आणि जनसेवेसाठी मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट नवी दिल्ली यांनी, श्री सिद्धिविनायक गार्डन हॉल,बिर्ला कॉलेज रोड, भोईरवाडी बस स्टॉप च्या बाजूला कल्याण पश्चिम येथे 10 मे 2022 ला हा पुरस्कार सोहळा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली हे उपस्थित राहणार आहेत.त्यांनाही मानवाधिकार

रत्न पुरस्कार देऊन रामेश्वर तेली चा सत्कार केला जाणार आहे. नुकताच डॉ. सुनील गायकवाड यांना लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड जाहीर झाला असून तो ही कार्यक्रम चार मे दोन हजार बावीस रोजी मुंबईमध्ये संपन्न होणार आहे.आणि दहा मे ला मानवाधिकार रत्न पुरस्कार संपन्न होणार आहे. डॉ. सुनिल गायकवाड यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांच्या सर्व मित्र परिवाराकडून अभिनंदन केले जात आहे.

Most Popular

To Top