निलंगा तालुक्यीतील ग्रामीण भागात लालपरी आवक-जावक होत नसल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांना प्रतिक्षा

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामिंडळाचे राज्य शासनात विलीनाकरण ( प्रशासकीय सेवा ) करावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा तिढा न्यायालयाने सोडविला आहे.आता लालपरी लवकरात लवकर सुरू व्हावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.निलंगा तालुक्यातील ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन

विद्यार्थी शिक्षणासाठी व कामानिमित्त नागरिक लातूर व निलंगा येथे जातात.आता आंदोलन संपले आहे.त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना परिवहन महामंडळाच्या लालपरी ची प्रतिक्षा आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे लालपरीची चाके एका जाग्यावरच रूतून बसली आणि याची झळ ग्रामीण भागातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेला

बसली आहे.गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या तोंडावर लालपरी बंद झाल्यामुळे दिवाळी व त्या काळातील लग्नसराईच्या हंगामात तर ग्रामीण जनतेला त्या काळातील लग्नसराईच्या हंगामात तर ग्रामीण जनतेला ज्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या त्या भूतो ना भविष्यती अशाच होत्या.न्यायालयीन हा संपाचा तिढा सोडविला असला तरी ग्रामीण रस्त्यांवर अजूनही लालपरी धावली

नाही.न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या २२ एप्रिलपर्यंत सर्व लालपरी कर्मचार्‍यांनी आपापल्या कामावर रूजू व्हायला हवे,असे असले तरी बरेच कर्मचारी यापूर्वी रूजू झाले आहेत, होत आहेत,ही बाब समाधानाची असली तरी ग्रामीण भागातील लालपरी अजूनही सुरू झाली नसल्यामुळे ती कधी सुरू होणार याची प्रतिक्षा होत आहे. एकंदर,लालपरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीने आता ग्रामीण भागात प्रवाशांच्या सुखासाठी लालपरी चालू करणे आवश्यक आहे.

 

 

Recent Posts