महाराष्ट्र खाकी (लातूर) – आद्य समाज सुधारक तसेच कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे आणि वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी थोर विभुती म्हणून संत जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया दिनी इ.स. 1105 मध्ये बसवेश्वर यांचा जन्म झाला. धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण अशा क्षेत्रांतील त्यांचे कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे.
भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून संत जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते. श्री जगतज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव 2022 च्या वतीने सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी प्रेरणा होनराव या उपस्थित होत्या . प्रेरणा
होनराव या सर्व जयंती उत्सवात सहभागी असतात.
या बैठकीत जयंती समितीचे अध्यक्ष मनोज पाटील रायवाडेकर यांचे प्रेरणा होनराव यांनी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. जयंती उत्सव कशा पद्धतीने साजरा करण्यात यावा याची रूपरेषा व त्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची चर्चा या बैठकीत करण्यात आली.
या बैठकीमध्ये बाराव्या शतकात लोकशाही जगाला देणारे महा युगपरुष जगतज्योती महात्मा बसवेश्वर होऊन गेले. व त्यांनी दिलेला समतेचा मंत्र घेऊन जयंती साजरी करण्यात यावी असे प्रेरणा होनराव यांनी सर्व कार्यकर्त्यांना संबोधित केले.