महाराष्ट्र

धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘भीम महोत्सव 2022’ ची सांगता “भिमा तुझ्या जन्मामुळे” या महानाट्याने

महाराष्ट्र खाकी ( परळी ) – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘भीम महोत्सव 2022’ मध्ये “भिमा तुझ्या जन्मामुळे” या महानाट्याने ‘भीम महोत्सव 2022’ ची सांगता झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील जन्मापासून ते महानिर्वाण पर्यंतचे सर्व महत्वाचे प्रसंग या नाटकात सादर करण्यात

आले.शालेय शिक्षणातील संघर्ष,माता रमाई यांचे आंबेडकर यांच्या जीवनातील योगदान,राजर्षी शाहू महाराज यांच्या सोबतचे संवाद,महाड चवदार तळे सत्याग्रह,नाशिक काळाराम मंदिर आंदोलन,हिंदू कोड बिल नाकारले म्हणून दिलेले त्यागपत्र,राजकीय आरक्षणकरीता महात्मा गांधी सोबत झालेला वैचारिक
मतभेद,पुणे करार,भारतीय राज्यघटना मसूदा लिहितानाचे

घेतलेले परिश्रम,दीक्षा भूमी वरील धर्मांतराची ऐतिहासिक घटना,बाबासाहेबांचे पुस्तक प्रेम,त्यांनी लिहिलेली असंख्य पुस्तके त्यांचे वर्णन या नाटकात समाविष्ट होते.
बाबासाहेबांना डोक्यावर घेतल्यापेक्षा डोक्यात घेवून त्यांच्या विचारा प्रमाणे जगणे व आचरण महत्वाचे हा संदेश या नाटकातून प्राप्त होतो.तसेच डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांच्या जन्मामुळे भारतातील कोट्यवधी

कुटुंबांना माणूस म्हणून जगण्याचा नाकारलेला अधिकार प्राप्त झाला आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा राज्यकर्ता समाज निर्माण होवू शकला. परळी शहरात नाटकासाठी अभूतपूर्व गर्दी जमावी हा एक भीममहोत्सव मधील विक्रम तयार झाला आहे.महिलांची संख्याही लक्षवेधी होती. भीम महोत्सव करीता परिश्रम घेतलेले सर्व समितीचे सहकारी यांच्यासह यशस्वी होण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व यंत्रणांचे आभार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

Most Popular

To Top