लातूर मधील स्टॅच्यू ऑफ नॉलेज साठी खासदार पुत्र शंकर शृंगारे यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान

महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव सोहळा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्ताने लातुरमध्ये खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या 72 फूट उंचीच्या स्टॅच्यू ऑफ नॉलेज ची दखल देशभरातल्या माध्यमांनी घेतली आहे,तशीच दखल

राज्यातल्या सामाजिक संस्थांनीही घेतली आहे. रात्रं-दिवस 72 फुटी स्टॅच्यू ऑफ नॉलेज पुतळ्यासाठी शंकर शृंगारे यांनी परिश्रम घेतले होते . दरम्यान यामध्येही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यावर मात करीत आम्ही हा पुतळा उभारला. डॉ.बाबासाहेबांच्या संविधानामुळे आम्हाला सन्मान मिळतो. डॉ.बाबासाहेबांची जयंती अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा मानस होता. तो पूर्ण

करन्यासाठी शंकर शृंगारे यांनी खूप मेहनत घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ,यांच्या हस्ते “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार” देऊन शंकर शृंगारे यांचा सन्मान करण्यात आला, हा सन्मान स्टॅच्यू ऑफ नॉलेज च्या यशस्वीतेसाठी देण्यात आला .सागा फिल्मस फाउंडेशनच्या वतीने या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

 

Recent Posts