परळीतील भीम महोत्सवाची प्रा. प्रकाशकुमार वाघमारे यांच्या ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ या नाटकाने रविवारी होणार सांगता

महाराष्ट्र खाकी ( परळी ) – सामान्य सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून दि. 15 ते 17 एप्रिल दरम्यान परळी येथे आयोजित तीन दिवसीय ‘भीम महोत्सवा’ची प्रसिद्ध नाटककार प्रा. प्रकाशकुमार वाघमारे यांच्या ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ या प्रसिद्ध नाटकाच्या प्रयोगाने सांगता होणार आहे.

परळी येथे धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून दि. 15 एप्रिल पासून भीम महोत्सव समितीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. यामध्ये दि. 15 रोजी उदय साटम यांच्या 75 कलाकारांच्या चमुचा ‘वंदन भीमराया’ हा रंगारंग कार्यक्रम संपन्न झाला. त्यापाठोपाठ दि. 16 (शनिवार) रोजी सुप्रसिद्ध सिने गायक आदर्श शिंदे यांचा भीमगीतांचा जंगी कार्यक्रम संपन्न होत आहे. या दोनही कार्यक्रमांना परळीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रविवारी सायंकाळी 7 वा. शहरातील मोंढा मैदान येथे प्रसिद्ध नाटककार प्रा. प्रकाशकुमार वाघमारे प्रस्तुत ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ या प्रसिद्ध नाटकाच्या प्रयोगाने या तीन दिवसीय भीम महोत्सवाची सांगता होणार असून, परळीकरांनी या नाट्य प्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भीम महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Recent Posts