लातूर येथे संशोधन,प्रशिक्षण व साहित्य निर्मितीसाठी बार्टी चे उपकेंद्र सुरू करावे – भाई उदय गवारे

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार 22 डिसेंबर1978 रोजी समता विचारपीठाची स्थापना करण्यात आली. संस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ऑक्टोबर 2008 च्या शासन निणार्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी),पुणे या स्वायत्त संस्थेस म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश संशोधन व प्रशिक्षण आणि सामाजिक समता उर्दिंगत करण्यासाठी शैक्षणिक उपक्रम,संमेलने, व्याख्याने,

परिसंवाद,आयोजित करणे आणि सामाजिक समता या तत्वप्रणाली चा अभ्यास करण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी संस्थेचे उपकेंद्र सुरू करावे हे ध्येय असल्यामुळेच बार्टी चे उपकेंद्र लातूर येथे सुरू करावे अशी मागणी मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,सामाजिक न्याय मंत्री तसेच लातूरचे पालकमंत्री ना. अमित देशमुख आणि राज्यमंत्री ना. संजय बनसोड यांच्याकडे भाई उदय गवारे यांनी केली आहे. बार्टी उपकेंद्रच्या माध्यमातून अनुसूचित जाती

जमाती च्या मुला-मुलींसाठी केंद्रीय व राज्य स्तरीय स्पर्धा परीक्षा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र लातूर येथे सुरू होईल. तसेच महामानवांचे जीवन चारित्र्य यांचे प्रकाशन,महिला सक्षमीकरण,समतावादी विचाराचे साहित्य प्रकाशित करणे शक्य होणार आहे.
लातूर सेंट्रल ऑफ नॉलेज – लातूर हे देशातील मुख्य शैक्षणिक केंद्र असून शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवून

एक वेगळा ठसा निर्माण झाला असुन आता शिक्षणा बरोबरच संशोधन, प्रशिक्षण व सामाजिक तत्व प्रणालीचा विकास होणे गरजे आहे.लातूर हे सेन्ट्रल ऑफ नॉलेज म्हणजेच ज्ञानाचे केंद्र बनण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थचे उपकेंद्र लातूर येथे सुरू करण्याचे गरजेचे आहेत जेणेकरून मराठवाड्यातील विद्यार्थी, युवक ,शासकीय

कर्मचारी आणि महिला यांना प्रशिक्षण,संशोधन तसेच लेखक व साहित्यिक यांना समतावादी विचाराचे साहित्याचे लेखन व साहित्य प्रकाशनाचे एक नवीन दालन सुरू होईल असे परिपत्रक भाई उदय गवारे यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे

Recent Posts