राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापात नाही – मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे

महाराष्ट्र खाकी (मुंबई) – शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोप प्रतीआरोप सध्या चालू आहेत. या बद्दल संजय राऊत यांनी मुंबई केंद्रशासित कशी करता येईल यासाठी भाजपाच्या पाच लोकांनी सादरीकरण तयार केलं असून ते गृहमंत्रालयाला दिलं आहे.

मुंबईतील काही धनिक, भाजपाचे नेते आणि बिल्डर यांच्या संगनमतानं हे सुरु असून किरीट सोमय्या यांचं नेतृत्व करत आहेत”, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. भाजपाच्या पाच लोकांनी सादरीकरण तयार केलं असून या चोर, लफंग्याचं नेतृत्व किरीट सोमय्यांकडे आहे. काही करुन त्यांना मुंबईवरील मराठी माणसाचा हक्क आणि अधिकार काढायचा आहे.

मुंबई वेगळी करुन मुंबईवर केंद्राचं राज्य आणायचं असून किरीट सोमय्या हा लंफगा. चोर, महाराष्ट्रद्रोही हे सादरीकरण घेऊन दिल्लीत जात असतो. आजही त्यासाठी ते दिल्लीत गेले आहेत. माझ्याकडे सबळ पुरावे आहेत,” असे गंभीर आरोप राऊत यांनी सोमय्यांवर आणि केंद्र सरकारवर केले आहेत.

या आरोपावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी  पलटवार केला आहे .राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापात नाही, असे म्हणत राऊतांच्या आरोपावर पलटवार केला आहे.

”विचार भ्रमकार सामनावीर यांनी जो हिशोब “इ. डी” द्यायचाय त्याची चिंता करावी, राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोण्याच्या बापात नाही”, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

Recent Posts