महाराष्ट्र

उदगीर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची आमदार बाबासाहेब पाटील यांनी पाहणी केली

महाराष्ट्र खाकी ( उदगीर ) – लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे 22, 23 व 24 एप्रिल 2022 रोजी होणाऱ्या 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची अहमदपूर – चाकूर चे आमदार बाबासाहेब पाटील यांनी पाहणी केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी सुरू आहे. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सध्या सुरू असलेल्या उन्हामुळे

नागरिकांना, साहित्यिकांना व पत्रकार बांधवांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी नियोजन करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.

यावेळी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, माजी जि प सदस्य माधवराव जाधव, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष चंदनभैय्या पाटील

नागराळकर, प्रा द मा माने सर, अनिल मुदावळे, जामिर भाई सय्यद, फेरोज देशमुख, माजी नगराध्यक्ष प्रा सोनकांबळे सर, विजय चवळे, शिवकुमार कांबळे, व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Most Popular

To Top