महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून लातूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या मैदानावर खा.सुधाकर श्रृंगारे यांच्या संकल्पनेतून व लातूरकरांच्या सहकार्यातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 72 फुटी प्रतिकृती अर्थात स्टॅच्यु ऑफ नॉलेज उभारण्यात आली आहे. या स्टॅच्युचा अनावरण सोहळा जयंतीच्या
पूर्वसंध्येला म्हणजेच दि.13 एप्रिल रोजी सायंकाळी 6.00 वाजता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या लक्षवेधी सोहळयास लातूर शहरासह जिल्हयातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकशाहीला घटना दिली आहे. या घटनेवर भारताची लोकशाही गेली कित्येक वर्षे सामाजिक समतोल राखून यशस्वी वाटचाल करत आहे. बाबासाहेबांनी देशातील कोटयावधी नागरिकांचा हक्क सुरक्षित ठेवण्याची कायदयात तरतुद केलेली आहे. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्व जाती धर्मांना आपलेसे वाटतात. भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दि.14 एप्रिल रोजी 131 वी जयंती साजरी होत आहे. या जयंतीचे औचित्य साधून लातूरचे खा.सुधाकर श्रृंगारे यांच्या संकल्पनेतून व लातूरकरांच्या सहकार्यातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 72 फुटी प्रतिकृती अर्थात स्टॅच्यु ऑफ नॉलेज उभारण्यात आली आहे. हा स्टॅच्यु कदाचित देशातील सर्वात मोठा पहिलाच स्टॅच्यु ठरण्याची शक्यता
आहे. या पुतळयाचे अनावरण जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवार दि.१३ एप्रिल रोजी सायंकाळी ०६.०० वांजता पार पडणार आहे. या सोहळयासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असुन यावेळी जिल्हयातील लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. या अनावरण कार्यक्रमासोबतच लेझर शो व नयनरम्य आतिषबाजी करण्यात येणार आहे.
या लक्षवेधी सोहळयास जिल्हयातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादंन करावे असे आवाहन माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.