महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिलेल्या आदेशानुसार व मा. विभागीय उप-आयुक्त प्रदिप एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह़यातील अधीक्षक गणेश बारगजे निरीक्षक, उदगीर यांचा स्टाफ यांनी सिध्द़ार्थनगर, चाकूर, ता. चाकूर, जि. लातूर तसेच माळेवाडी रोड,अहमदपूर, ता. अहमदपूर, जि. लातूर या
ठिकाणी दिनांक 5 एप्रिल, 2022 रोजी दुपारी 4-30 वा. पासून दि. 6 एप्रिल, 2022 रोजी पहाटेपर्यंत टाकलेल्या छाप्यामध्ये बनावट दारु बनविण्याचे बाटली, बुचे, लेबल व बॉक्स असे साहित्य असे एकूण 35 लाख 14 हजार अवैध मुद्येमाल जप्त करण्यात आला असल्याचे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश बारगजे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. गुन्हा क्र. 64/2022 या गुन्ह्यात अज्ञात इसमांविरुद्व तसेच गुन्हा क्र. 65/2022 यामध्ये अनुज्ञप्तीधारकांविरुद्व गुन्हा नोंद करण्यात आला.
या कारवाईमध्ये अधीक्षक गणेश बारगजे, निरीक्षक आर. एम. चाटे, निरीक्षक आर. एम. बांगर, दुय्यम निरीक्षक विजय पी. राठोड, देवदत्त पाचपोळे, एल. बी. माटेकर, अमोल शिंदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अनंत कारभारी, गणेश गोळे, जवान सुरेश काळे, ज्योतीराम पवार, श्रीकांत एस. साळुंके, अनिरुद्व देशपांडे, हनुमंत मुंडे, के. बी. गोसावी, वाहनचालक एकनाथ फडणीस, विक्रम परळीकर यांनी सहभाग नोंदविला. पुढील तपास निरीक्षकआर. एम. चाटे हे करित आहेत.