राजकारण

सर्वसामान्यांसाठी दानत्त्व करणारा शिवाभाऊ नवनाथ डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त साकोळ येथे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील सामाजिक कार्यकर्ता शिवाभाऊ नवनाथ डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त साकोळ येथे लायन्स क्लब उदगीर यांच्या वतिने डोळयाचे शिबीर आयोजित करून त्यामध्ये 512 लोकांची तपासणी करून 76 लोकांना ऑपरेशन करण्याचा सल्ला डाॅ.लखोटीया यांनी दिला.वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित डोळयाच्या शिबीराला भरभरून प्रतिसाद मिळाला आसून या शिबिरासाठी साकोळसह परिसरातील घुग्गी सांगवी,राणी अंकुलगा,बाकली,बिबराळ,आजनी,

तिपराळ, कानेगाव,शेंद,तळेगाव येथील लोकांनी मोठ्याप्रमाणात या शिबीराचा लाभ घेतल्यामुळे शिबीरात जास्तीत जास्त लोकांची तपासणी करून 512 रूग्णांची तपासणी केली असता 76 लोकांना ऑपरेशन करणे गरजेचे असल्याचे लायन्स क्लब उदगीरचे डाॅ.लखोटीया तसेच डाॅ.पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साकोळ ग्रामपंचायतचे उपसरपंच राजकुमार पाटील हे होते.तर उद्घाटक म्हणून सहकार महर्षी वैजनाथअण्णा वैजापूरे हे होते. या प्रसंगी शिवाभाऊ

यांनी मी समाजसेवेचा विडा उचलला असून गोरगरीब कुटुंबातील तसेच कुठल्याही क्षेत्रातील गरजूंसाठी तात्काळ त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य देत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी विधवा,श्रावणबाळ,निराधार यांना त्यांच्या पगारी चालू करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले.त्यानंतर त्यांनी जि.प.प्रशाला साकोळ येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून सध्या चालू असलेल्या रोजा

निमित्त साकोळ येथील मज्जिद मध्ये इफ्तार पार्टी देण्यात
आली. या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत सदस्य सचिन गोविंद माळी,मनोज आवाळे,वैजीनाथ मटचे,गावातील प्रतिष्ठित नागरिक भुजंगा,चंदर कवठाळे,संजीव भूरे आदींसह डोंगरे यांच्या मित्र परिवाराकडून मोलाचे सहकार्य करण्यात आले.

Most Popular

To Top