लातूर जिल्हा

दादा बळीराम शिवराम गायकवाड यांची पुण्यतिथी साजरी

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी सचिव तथा समृद्धी महामार्गाचे जॉईंट एमडी अनिलकुमार बळीराम गायकवाड आणि लातूरचे माजी लोकप्रिय संसद रत्न खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड , वत्सला बळीराम पेट्रोलियम पंप चे मालक विजयकुमार बळीराम गायकवाड यांचे पिताश्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत चळवळीत

काम केलेले,बळीराम शिवराम गायकवाड यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त लातूर येथील कळंब रोड वरील हरंगुल (बु) येथे असलेले बळीराम गायकवाड चैत्य स्तूप या ठिकाणी सहावा परिनिर्वान दिन साजरा करण्यात आला.
परिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे खरोसा बुद्ध लेणी येथील पूजनीय भन्तेजी सुमेध यांनी बौद्ध संस्कारांनुसार विधी संपन्न केला.

कार्यक्रमास समृद्धी महामार्गाचे जॉईंट एमडी अनिल कुमार बळीराम गायकवाड, महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री संजय बनसोडे, औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार अभिमन्यु पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी,निलंगा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष अमित भाई शेख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती काँग्रेस नेते अजीतराव माने,

सुनील माने, बहुजन समाज पार्टीचे गौतम साबळे, लातूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते मोहनराव माने, लातूर लातूर शिक्षण सभापती हरिभाऊ गायकवाड, लातूर सार्वजनिक आंबेडकर जयंती चे अध्यक्ष नवनाथ आल्टे, राहुल कांबळे, प्राध्यापक अनंत लांडगे, पत्रकार संघाचे अशोक देडे, टी व्ही ९ चे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र जोंधळे, निलंगा विधानसभेचे राष्ट्रवादी

काँग्रेसचे नेते भावी आमदार विनायक बगदुरे, रामलिंग पडसाळगे, दयानंद चोपणे, उद्योगपती योगेश गिरवलकर, व्यापारी नरेश मोटवानी, सिद्धेश्वर विश्वे कर, बौद्ध उपासक बाळासाहेब कांबळे, अधीक्षक अभियंता बांधकाम विभाग चे शेख, पुणे चे उद्योगपती चंद्रकांत दुखणे, उद्योगपती योगेश पवार, पत्रकार चेतन शिंदे, कार्यकारी अभियंता संतोष चंद्रमणी, सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी निवृत्तीराव

भगले, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख पांडुरंग अंबुलगेकर, नगरसेवक प्रवीण अंबुलगेकर, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनाताई भोसले, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस श्रद्धा जगताप, पतंजली युवा जिल्हाध्यक्ष अमर वाघमारे, ब्ल्यू पॅंथरचे साधू गायकवाड, युवा भिम सेना चे संस्थापक अध्यक्ष पंकज काटे, अहमदपूरचे माजी नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ सूर्यवंशी, आदी मान्यवर मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Most Popular

To Top