महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी नुकतीच प्रस्तावित सारथी विभागीय केंद्रासाठी आवश्यक असलेल्या जागेची पाहणी करून संबंधितांकडून आवश्यक माहिती घेतली. या सारथी विभागीय केंद्रात 500 मुलींसाठी आणि 500 मुलांसाठीचे
वसतीगृह, 300 विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, पोलीस, सैनिक भरतीपूर्व तयारीसाठी प्रशिक्षण केंद्र या सुविधा उपलब्ध असणार आहेत. सारथी विभागीय केंद्रासाठी एकूण चार हेक्टरसाठी प्रस्ताव असून त्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सुचना केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, मनपा आयुक्त अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, लातूर उपविभागीय अधिकारी सुनील यादव, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख, तहसीलदार स्वप्निल पवार, गट विकास अधिकारी श्याम गोडभरले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ,
उपअभियंता रोहन जाधव, शाखा अभियंता विजय आवाळे, जिल्हा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण अधिकारी सोमेश्वर वाघमारे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) प्राचार्य अजय त्रिचूरकर, हरंगुळ (बु) तलाठी गिरीश डोईजोडे, वरवंटी तलाठी सानिया सौदागर आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.