महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्हा पोलिसांचा कारभार तरुण ips अधिकारी निखिल पिंगळे यांच्या हातात आल्या पासून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमालीची कमी झाली आहे हे लातूरकरांना दिसून येत आहे. निखिल पिंगळे यांनी आपल्या शांत, संयमी आणि योग्य वेळी योग्य कारवाई करून जिल्ह्यातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. आता निखिल पिंगळे यांनी आणखीन एका मोठी कारवाई केली आहे. लातूर पोलिसा दलाकडून बऱ्याच वर्षानंतर मोक्का अंतर्गत कारवाई करून गुन्हेगारांना चांगलीच अद्दल घडवली आहे.
आणि गुन्हेगारी क्षेत्रात येण्याचा विचार करणाऱ्यांच्या मानत धडकी भरवली आहे. या कारवाईने जिल्हाभरातून पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे कौतुक होत आहे. दिनांक 23/02/2022 रोजी सायंकाळच्या सुमारास लातूर शहरातील छत्रपती चौक ते बार्शी जाणारे रिंगरोड वरील एका हॉटेलमध्ये जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगारांनी चाकूचा धाक दाखवून हॉटेल चालकास “तू मला जेवणाचे पैसे का मागतोस? आम्ही दादा आहोत असे म्हणून आम्हाला खर्च
करण्यासाठी तूच 5,000/- रुपये दे” असे म्हणून हॉटेल चालकाच्या काउंटर मधील 4,700/- रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हॉटेलमधील वाचमन, वेटर व इतर ग्राहकांना मारहाण करून खल्लास करण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादीवरून विवेकानंद चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 126/2022 कलम 395, 397 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्ह्यातील आरोपी यांच्या विरुद्ध या अगोदर पोलीस स्टेशन शिवाजी नगर पोलीस स्टेशन, विवेकानंद पोलीस स्टेशन, लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन, तसेच वाकड पोलिस स्टेशन, हिंजवडी पोलिस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय या ठिकाणी सुद्धा जीवे ठार मारणे, ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर रित्या घातक शस्त्र वापरणे, घातक शस्त्रांची विक्री करणे, घातक शास्त्राचा वापर करून गंभीर दुखापत
करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, बेकायदेशीर रित्या हत्यार जवळ बाळगून त्याचा वापर करून लुटमार करणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण 18 गुन्हे दाखल असल्याचे सिद्ध झाले. आरोपी पंकज श्यामसुंदर पारीख याने इतर वेगवेगळ्या साथीदारांना एकत्र करून टोळी तयार करून, टोळीतील सदस्याचे साह्याने वेळोवेळी लातूर शहर व परिसरामध्ये हिंसाचाराचा अवलंब करून वर्चस्व राहावे व त्यातून त्यांना आर्थिक लाभ होणे साठी
संघटितपणे वेगवेगळे साथीदार घेऊन टोळी निर्माण केली होती. त्यामुळे त्यांच्यावर वेळोवेळी प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली होती. परंतु त्यांच्यामध्ये काहीच फरक पडला नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर (DYSP) जितेंद्र जगदाळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण ( मोक्का ) कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव तयार करून हा
प्रस्ताव मंजुरीसाठी पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र निसार तांबोळी, नांदेड यांच्याकडे सादर करण्यात आलेला होता. या प्रस्तावाला पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी मंजुरी दिल्याने आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का ) कायदा 1999 अन्वये कारवाई करण्यात आली .या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे हे करीत आहेत.
मोक्का अंतर्गत कारवाई केलेले आरोपी
1) पंकज श्यामसुंदर पारिख, वय 26 वर्ष, राहणार भोक्रंबा तालुका रेनापुर, सध्या राहणार आदर्श कॉलनी लातूर. 2) श्रीहर्ष उर्फ हर्षवर्धन देवेंद्र मोरे, वय 18 वर्ष, राहणार मोती नगर लातूर. 3) यश उर्फ यशोधन केशव कातळे, वय 19 वर्ष, शिक्षण राहणार गरसुळी तालुका रेनापुर, सध्या राहणार अष्टविनायक मंदिराजवळ, शिवाजीनगर लातूर. 4) बालाजी सुधाकर शिंदे, वय 25 वर्ष, राहणार मुळकी तालुका अहमदपूर,सध्या राहणार रेणुका नगर लातूर. 5) सुमित उर्फ सुम्या सतीश बनसोडे, वय 26 वर्ष, राहणार गांधी नगर लातूर. 6) आदित्य बाळकृष्ण पाटील, वय 20 वर्ष, राहणार परशुराम पार्क हरंगुळ रोड, लातूर.
हि कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र, नांदेड निसार तांबोळी, लातूर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक शगजानन भातलवंडे, पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर पोलीस अमलदार अभिमन्यू सोनटक्के, पांडुरंग सगरे यांनी पार पाडली.