महाराष्ट्र

समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेली पत्रकारिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती – मा.खासदार डॉ. सुनील गायकवाड

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन लातूरचे माजी लोकप्रिय संसद रत्न खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष प्रमुख पाहुणे म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर हे उपस्थित होते. उद्घाटन भाषणात माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड म्हणाले बाबासाहेबांनी ज्या काळात पत्रकारिता सुरू केली होती सामाजिक चळवळीमध्ये अस्पृश्य समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि आपले विचार लोकांपर्यंत

पोहोचवण्यासाठी मूकनायक, बहिष्कृत भारत ,जनता ,असे वर्तमानपत्र बाबासाहेबांनी सुरू केले होते बाबासाहेबांच्या चळवळींमध्ये त्यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचे मोठं योगदान होतं .राजर्षी शाहू महाविद्यालयाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरू करावा अशी सूचनाही आपल्या मनोगतात व्यक्त केली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर

बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या पत्रकारितेच्या संदर्भात माहिती दिली.आणि बाबासाहेबांनी सुरू केलेल्या बहिष्कृत भारत याच वर्तमानपत्राचं नाव नंतर प्रबुद्ध भारत झालं त्या प्रबुद्ध भारत चे संपादक म्हणून भीमराव आंबेडकर काम करत आहेत बाबासाहेबांना वर्तमानपत्र चालवत असताना आलेल्या अनेक अडचणी आपल्या मनोगतात मांडल्या.

कार्यशाळेमध्ये विशेष उपस्थिती प्रसिद्ध वक्ते डॉक्टर ऋषिकेश कांबळे प्रसिद्ध साहित्यिक प्रल्हाद लुळेकर, यांचीही भाषणे झाली. कार्य शाळेच्या उद्घाटनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता हा ग्रंथ मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे आणि प्राध्यापक संभाजी पाटील

यांच्या पुढाकाराने या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे संस्थापक सदस्य तथा सध्याचे सचिव माजी प्राचार्य अनिरुद्ध जाधव हे होते.
कार्यशाळेसाठी परिसरातील महाविद्यालयाचे अनेक प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

Most Popular

To Top