बळीराम गायकवाड यांच्या चैत्य स्तूपास भीमराव यशवंत आंबेडकर यांची भेट

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – भारतरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभा चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर यांनी लातूर येथे माजी खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मा.सचिव तथा एम

एस आर डी सी चे जॉईंट एमडी अनिल कुमार बळीराम गायकवाड यांचे पिताश्री बळीराम शिवराम गायकवाड यांच्या चैत्य स्तूपास आज भेट दिली. दादा बळीराम शिवराम गायकवाड यांची एक एप्रिल रोजी सहावी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त पूर्वसंध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी दादांच्या

चैत्य स्तूपात त्यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि चैत्य स्तूप हा पूर्ण वीट आणि बांधकाम केलेले पाहून या स्तूपाचे कौतुक केले. गायकवाड परिवाराचे प्रमुख अनिल कुमार अण्णा बळीराम गायकवाड यांच्या हस्ते आदरणीय भीमराव आंबेडकर यांचा सत्कार करून काही ग्रंथ भेट दिले.

भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांनी या पवित्र स्थळास भेट दिल्याने गायकवाड परिवारा कडून त्यांचे आभार मानण्यात आले. त्यांच्यासोबत भारतीय बौद्ध महासभा जिल्हा लातूर चे प्रमुख प्राध्यापक बापू गायकवाड, प्राध्यापक युवराज दस वाडीकर आणि समता सैनिक दलाचे अनेक जण उपस्थित होते.

Recent Posts