लातूरचे माजी पालकमंञी तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे पक्षश्रेष्ठींनी भंडारा आणि गोंदियाची प्रभारी पदाची जबाबदारी सोपविली

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष माजी पालकमंजी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींने त्यांच्यावर आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीसाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर कर्तव्यदक्ष म्हणून त्यांच्याकडे कार्यकर्ते पाहातात.त्यांची साधी राहणी आणि उच्चविचार श्रेणी असल्याने त्यांच्याकडे पक्षात संघटनात्मक बांधणी कशी करावी ही हातकंडा असल्याने त्यांच्याकडे पक्षश्रेष्ठींने भंडारा आणि गोंदियासाठी लोकसभा,विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

निलंगा विधानसभा मतदारसंघात त्यांची भंडारा आणि गोंदियासाठी लोकसभा,विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी नियुक्ती झाल्याने सोशल मिडीयाव्दारे अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

Recent Posts