महाराष्ट्र

लातूर जिल्हा बँकेत महीला कक्षाचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकात अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन संचालक मंडळात नुकत्याच 4 महीला संचालक म्हणून निवडून आलेल्या असून त्यांना मुख्यालयात बसण्यासाठी स्वतंत्र केबिन महीला कक्ष स्थापन करण्यात आले असून या प्रशस्त कार्यालयाचा शुभारंभ माजी मंत्री सहकार महर्षी जिल्हा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते बुधवारी 30 मार्च रोजी करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख हे होते

तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, संचालक अँड श्रीपतराव काकडे, अशोकराव पाटील निलंगेकर, बँकेच्या संचालिका श्रीमती लक्ष्मीबाई भोसले, सौ स्वयंप्रभा पाटील, सौ सपना कीसवे सौ अनिता केंद्रे, संचालक पृथ्वीराज शिरसाठ, अशोकराव गोविंदपूरकर, जयेश माने, एन आर पाटील, राजकुमार पाटील, व्यंकट राव बिरादार, मारुती पांडे, दिलिप पाटील नागराळकर, अनुप शेळके, स्वीकृत संचालक सुनिल कोचेटा, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव बँकेचे सरव्यवस्थापक, विविध खाते प्रमूख अधिकारी उपस्थित होते

कार्यक्रमास राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे ,व्हॉईस चेअरमन अनंतराव देशमुख विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपत बाजू लगे, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, आदी मान्यवर उपस्थित होते…

Most Popular

To Top