महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगावासीयांना जवळपास 40 हजार लोकसंख्या व ‘ क ‘ वर्ष नगरपालिका असलेल्या शहरासाठी परवडणारी योजना नसतानाही राजकीय प्राबल्याने मंजूर केलेल्या विशेष पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाकडे आले आहे.त्यामुळे निलंगावासीयांना आता चोवीस तास शुध्द पाणी मिळत आहे.हे काम वेळेत व जलद गतीने पूर्ण केलेल्या ठेकेदाराचेही कौतुक होत आहे.
माजी मुख्यमंञी दिवंगत डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंजूर केलेल्या योजनेवर दुरूस्तीचा खर्च परवडणारा नव्हता,म्हणून माजी पालकमंञी तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत जवळपास 55 किलोमीटर अंतरावरून निलंगा शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास नगरविकास विभागाने
तीन वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती.नागरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी व नागरिकांचा दर्जा वाढविण्याकरिता ही योजना आहे.जवळपास 84 कोटी रूपयांच्या या योजनेचे काम जलद गतीने काम सुरू करण्यात आले असून,यायोजनेत पाणीपुरवठा नविन विहीर,चार पाण्याचे जलकुंभ,नविन आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिल्टर,माकणी ते निलंगा 55 किलोमीटर लोखंडी सेन्सर युक्त पाईपलाईन शहरात 128 किलोमीटर अंतर्गत पाईपलाईनचा समावेश आहे.
शहरात 128 किलोमीटरची अंतर्गत पाईपलाईन पूर्ण झाली आहे.शिवाय,तीन जलकुंभाचे तीन झोन केले असून, MIDC येथे टाकी नंबर एक तयार आहे.उर्वरीत दोन टाक्या नगरपरिषदेच्या मागे व तिसरी टाकी उदगीर मोड येथे वीज केंद्राच्या जवळ आहे.शहरात अंतर्गत पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून,घर तेथे नळजोडणी करण्यात आली आहे.केवळ पाचशे जोडणी देणे बाकी असून,सध्या पूर्ण क्षमतेने नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा सुरू आहे.
मराठवाड्यातील ‘ क ‘ वर्ग नगरपालिकेत मीटर बसवून चोवीस तास शुध्द पाणी देणारी एकमेव निलंगा नगरपालिका आहे.निम्नतेरणा प्रकल्पातील एप्रोच चॅनल,इंटेक वेल,इन्पेक्शन वेल,कनेक्टिंग मेन,जॅकवेल,आरसीसी अप्रोच पूल,हेड वर्क मिटर रूम,एप्रोच रोड,मेन जॅक वेल अशी डॅमवरील सर्व कामे पूर्ण झाली,त्यामुळेच ही योजना वेळेत पूर्ण झाली आहे . पूर्वी ज्या भागात अधिक दाबाने
पाणी मिळत नव्हते.त्या ठिकाणीही आता प्रेशरने पाणी मिळत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून या कामावर देखरेख असून,अतिशय जलदगतीने हे काम झाले आहे.कामाची मुदत 24 महिने असली तरी मुदतीच्या आतच ही योजना पूर्ण झाल्याने ठेकेदाराचे कौतुक केले जात आहे.माजी पालकमंञी तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नाने निलंगा शहराला 24 तास पाणीपुरवठा होत आहे.
” या योजनेतील काही भागात जे नळ जोडणी राहीले आहे.ते नागरिकांमुळे राहिले आहे. ‘ क ‘ वर्ग नगरपालिका दर्जात मराठवाड्यातील ही पहिलीच नगरपालिका आहे,जी मिटर बसवून नागरिकांना शुध्द दररोज पाणीपुरवठा देण्यात येणार असल्याने नागरिकांनी या शुध्द पाण्याचा वापर योग्य करावा व अपव्यय टाळावा “.
सुंदर बोंदर ( मुख्याधिकारी नगरपालिका,निलंगा )