महाराष्ट्र

पालकमंत्री अमित देशमुख यांनी नागरिकांच्या घेतल्या भेटीगाठी निवेदनाचा स्वीकार करून संबंधितांना केल्या आवश्यक सूचना

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रशांत साळुंके ) – महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज मंगळवार दि. 29 मार्च रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, पक्षातील नगरसेवक, शिष्टमंडळे तसेच नागरीकांच्या भेटी घेतल्या.

त्यांच्याकडून निवेदने स्वीकारुन अडीअडचणी संबंधित विभागांना त्या सोडवण्या संबंधी निर्देश दिले. विविध शिष्टमंडळानी दिलेले आमंत्रण स्वीकारली.यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे गुरुजी, चंद्रशेखर दंडिमे, नगरसेवक युनुस मोमिन, पप्पू देशमुख, सचिन बंडापल्ले, नागसेन कामेगावकर, बालाप्रसाद

बिदादा, ओमप्रकाश मोतीपवळे, लक्ष्मीकांत सोनी, संजय बोरा, पत्रकार शशिकांत जाधव, उद्योजक तुकाराम पाटील, प्रा.सुधीर पोतदार, राम बोरगावकर, बाबूराव जाधव, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, उमेश पाटील, सचितानंद ढगे, शशीभाई भिकाने, निलेश राजमाने, संतोष बिराजदार, प्रवीण घोटाळे, व्यंकटेश पुरी, डॉ. अमित लोमटे, डॉ. प्रशांत घुले, डॉ. योगेश माने, डॉ. रवींद्र सुरवसे, डॉ. नागेश अब्दागिरे, डॉ.रवी कांबळे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

काँग्रेस मिडिया सेल जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल
व्यंकटेश पुरी यांनी पालकमंत्री ना. अमित देशमुख यांचे मानले आभार लातूर काँग्रेस मिडिया सेल जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल व्यंकटेश पुरी यांनी पालकमंत्री ना. अमित देशमुख यांची आज भेट घेऊन जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानले, यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Most Popular

To Top