चंद्रपूर LCB पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी गांज्या तस्कर शिक्षकाला 103 किलो गांजा आणि 41 लाख 15 हजार 170 रुपयांचा मुद्देमालासह केली अटक

महाराष्ट्र खाकी  ( चंद्रपूर ) – चंद्रपूर LCB पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आपल्या कामगिरीने अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. असाच एक गुन्हा त्यांनी उघडकीस आणला आहे. विद्यार्थ्यांना घडविणारा शिक्षकच खुद्द विद्यार्थ्यांना गांजा देत त्यांचे आयुष्य व्यसनात गुरफटत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षणनाचे पवित्र कार्य साेडून गांजा तस्करी करणाऱ्या या शिक्षकासह अन्य एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अटक केली.

शनिवारी तेलंगणातून गडचिरोलीमार्गे चंद्रपूर येथे गांजा तस्करी करताना चिचपल्ली गावाजवळ त्यांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पकडले. यावेळी 103 किलो 839 ग्रॅम गांजासह सुमारे 41 लाख 15 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिक्षक श्रीनिवास नरसय्या मचेडी वय 50 शंकर बलय्या घंटा असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

परराज्यातून गडचिरोली मार्गावरून चंद्रपूरकडे दोन चारचाकी वाहनांतून गांजा तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे यांच्या नेतृत्वात दोन वेगवेगळी पथके तयार करून मूल-चंद्रपूर रोडवर चिचपल्ली गावजवळील शेर-ए पंजाब ढाब्याजवळ पाळत ठेवली.

दरम्यान, होंडा सिटी व मारुती स्विफ्ट या दोन गाड्या थांबवून वाहनाची तपासणी केली असता दोन्ही वाहनांत एकूण 51 पाकिटांमध्ये 103 किलो 839 ग्रॅम वजनाचा 31 लाख 15 हजार 170 रुपये किमतीचा गांजा आढळून आला. पोलिसांनी दोन्ही वाहनांसह सर्व 41 लाख 15 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध कलम 8 (क), 20 (ब) (क) NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक केली.

Recent Posts