लातूर मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 72 फुटी स्‍टॅचुय ऑफ नॉलेज उभारण्‍यासाठी संघटनानी पुढाकार घ्‍यावा-आ.संभाजी पाटील निलंगेकर

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी लातूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कच्‍या मैदानावर 72 फुटी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्‍यासाठी पुढाकार घेतलेला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीच्‍या पुर्वसंध्‍येला या पुतळयाचे

अनावरण होणार असुन हा पुतळा उभारण्‍यासाठी शहरासह जिल्‍हयातील संघटनांनी पुढाकार घ्‍यावा असे आवहान करून जयंती भव्‍यदिव्‍य स्‍वरूपात साजरी व्‍हावी अशी अपेक्षा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्‍यक्‍त केली.

लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्‍या पुढाकारातून लातूरात 72 फुटी स्‍टॅचुय ऑफ नॉलेज अर्थात भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्‍यात येत आहे. या कामात विविध संघटनांचा सहभाग असावा याकरीता शहरासह जिल्‍हयातील विविध सामाजिक संघटनेची बैठक आयोजित करण्‍यात आलेली होती. या

बैठकीत आमदार संभाजी पाटील निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार सुधाकर श्रृंगारे, प्रदेश कार्यकारणी सदस्‍य शैलेश लाहोटी, युवामोर्चाचे सरचिटणीस शंकर श्रृंगारे, व्हिएस पॅंथर्सचे विनोद खटके, प्रदेश भाजयुमोच्‍या प्रेरणा होनराव, अॅड.ज्ञानेश्‍वर चेवले, आदीची उपस्थिती होती.

भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आगळयावेळया स्‍वरूपात साजरी व्‍हावी अशी संकल्‍पना खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी मांडली होती असे सांगून आमदार निलंगेकर यांनी या माध्‍यमातून लातूरात स्‍टॅचुय ऑफ नॉलेज अर्थात भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

यांचा 72 फुटी पुतळा उभारण्‍याचा उपक्रम हाती घेण्‍यात आलेला आहे. वास्‍तविक हा उपक्रम पुर्णत्‍वास जाण्‍यासाठी खासदार सुधाकर श्रृंगारे हे निमित्‍त असुन या कामात सर्व संघटनासह लोकांचा सहभाग असणे तितकाच गरजेचा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतासाठीच

नव्‍हे तर संपूर्ण जगासाठी आदर्शदायी व्‍यक्‍तीमत्‍व होते. त्‍यामुळेच या उपक्रमासह 14 एप्रिल रोजी साज-या होणा-या जयंती उत्‍सवात सर्वंच समाजाचा सहभाग तितकाच आवश्‍यक असल्‍याचे सांगत आमदार निलंगेकर यांनी हा उपक्रम अधिकाधिक लोकापर्यात पोहचण्‍यासाठी आणि जयंती उत्‍सव भव्‍यदिव्‍य स्‍वरूपात साजरा व्‍हावा याकरीता संघटनांसह सर्वांनीच पुढाकार घ्‍यावा असे आवहान आमदार निलंगेकर यांनी केले आहे.

या माध्‍यमातून शिवशक्‍ती व भिमशक्‍ती एकत्रि‍त येवून एक वेगळा आदर्श लातूरकर संपूर्ण देशासाठी निर्माण करतील अशी अपेक्षा व्‍यक्‍त करत आ.निलंगेकर यांनी 72 फुटी उभारण्‍यात येणा-या स्‍टॅचुय ऑफ नॉलेजच्‍या दर्शनासाठी आणि अभिवादन करण्‍यासाठी जनसागर लोटेल असा विश्‍वास व्‍यक्‍त केला.72 फुटी स्‍टॅचुय ऑफ

नॉलेच्‍या माध्‍यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक एकोप्‍याचा संदेश आणि त्‍यांच्‍या कामाची प्रेरणा सातत्‍याने सर्वांना मिळणार आहे. त्‍यामुळेच लातूर जिल्‍हयासह इतर जिल्‍हयातील नागरिक सुध्‍दा या

पुतळयाचे दर्शन घेण्‍यासाठी गर्दी करतील अशी अपेक्षा आ.निलंगेकर यांनी यावेळी व्‍यक्‍त केला. कदाचित लातूरात उभारण्‍यात येत असलेल्‍या स्‍टॅंचुय ऑफ नॉलेजची संकल्‍पना देशासाठी सुध्‍दा दिशादर्शक ठरेल असे आ. निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत खा.सुधाकर श्रृंगारे यांनी ज्‍या समाजाने मला मोठे केले आहे त्‍या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतूनच आपण हा उपक्रम राबवत असल्‍याचे सांगून याकरीता लातूरकरांनी साथ दयावी असे आवहान केले.या बैठकीत विविध सामाजिक संघटनांच्‍या पदाधिका-यांनी आपआपले विचार व्‍यक्‍त करून दि.13

व 14 एप्रिल रोजी लातूरात साजरी होणारी भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भव्‍यदिव्‍य स्‍वरूपात साजरी करण्‍याचा निर्धार व्‍यक्‍त केला. भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंती निमित्‍त एक आगळावेगळा उपक्रम खा.सुधाकर श्रृंगारे यांनी माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली हाती घेतल्‍याबददल सामाजिक संघटनेच्‍या वतीने खासदार सुधाकर श्रृंगारे व आमदार संभाजी निलंगेकर यांचा सत्‍कार यावेळी करण्‍यात आला.

Recent Posts