अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

महाराष्ट्र खाकी (अमरावती) – अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भाग औद्योगिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम व्हावा यासाठी बळकट व सुरक्षित रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळनासह इतर नागरी सुविधांच्या निर्मितीसाठी विकासनिधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिवानखेड येथे दिली.

आज तिवसा येथील दिवाणखेड, मार्डी, चेनुष्ठा, जहागिरपुर, बोर्डा, आखतवाडा, धामंत्री, उंबरखेड, तारखेड, मोझरी येथील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

विकासकामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे

दिवाणखेड येथे 11 लक्ष रुपयांच्या निधीतून स्थानिक रस्त्याच्या कामाचे, 20 लक्ष रुपयांच्या निधीतून मूलभूत सुविधा निधीअंतर्गत मार्डी-तिवसा येथील गणपती मंदिर ते पेट्रोल पंप कडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरणच्या कामाचे, स्थानिक रस्त्याच्या कामाचे व पारधी वस्ती ते बळीराम महाराज मंदिरापर्यंत करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. येथे व्यायामशाळा,वाचनालय, दिवाणखेड-परसोडा रस्त्याचे खडीकरण, काँक्रीटीकरण, नाला खोलीकरण आदींच्या कामासाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी संबंधितांना दिले.

कुऱ्हा येथे 1 कोटी 10 लक्ष रुपयांच्या निधीतून विकासकामे

कुऱ्हा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीची दुरुस्ती, निवासस्थानाची दुरुस्ती, संरक्षक भिंतीची उभारणी, हरिजन वस्तीतील सौंदर्यीकरण, स्थानिक रस्त्याचे काँक्रीटीकरण, हनुमान मंदिर परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण आदी कामे 1 कोटी 10 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येत आहे.या कामांचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

चेनुष्ठा येथे 1 कोटी 55 लक्ष रुपयांच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन

कुऱ्हा-चेनुष्ठा-बोर्डा येथे लहान पुलाचे बांधकाम, रस्ता काँक्रीटीकरण, रस्त्याची सुधारणेच्या 1 कोटी 55 लक्ष रुपयांच्या निधीतुन करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांनी केले. पुलाची उंची योग्य असावी. पुलनिर्मितीचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

बोर्डा, आखतवाडा, उंबरखेड, मोझरी येथील रस्ता व पुलाच्या कामाचे भूमिपूजन

बोर्डा शिंदवाडी येथील 38 लक्ष रुपयांच्या निधीतुन करण्यात येणाऱ्या कामाचे, आखतवाडा-धामंत्री रस्ताचे 50 लक्ष रुपयांच्या निधीतुन मजबुतीकरण, उंबरखेड ते तारखेड रस्ता व नालीचे 36 लक्ष निधीतुन बांधकाम, दापोरी जावरा रस्ता व पुलाचे 1 कोटी 50 लक्ष निधीतुन बांधकाम व मोझरी ते शेंदूरजना बाजार रस्ताचे मनरेगा अंतर्गत मोझरी गावातील रस्याीकच्या बांधकामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती पूजा आमले, पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, तिवसा तहसीलदार वैभव फरतारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, जिल्हा परिषद बंधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आदी उपस्थित होते.

 

Recent Posts