महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील निटूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंञी अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जगप्रसिध्द नेञरोग तज्ञ पद्मश्री डाॅ.तात्याराव लहाने यांच्या शुभहस्ते मोफत नेञ चिकित्सा आणि मोतीबिंदू शस्ञक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आल्याने पूर्वबैढक पार पडली.
याप्रसंगी,संगांयोचे सदस्य सुरेंद्र धुमाळ,व्हा.चेअरमन दिनकर निटूरे,नंदकुमार हासबे,राजकुमार सोनी,दिलीप हुलसुरे,ताजपूरचे उपसरपंच बालाजी भूरे,बूजरूकवाडीचे सरपंच साहेबराव भोयबार,ढोबळेवाडीचे सरपंच रमेश देशमुख,प्रभाकर चव्हाण,संभाजी सूर्यवंशी,व्यंकट पाटील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ श्रीनिवास मोरे,कर्मचारी,आशाताई यांची उपस्थिती होती.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय शिक्षण व सांस्कृृृतिक कार्यमंञी अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बैढकीत रूग्णांसाठी मोफत नेञ चिकित्सा आणि मोतीबिंदू शस्ञक्रियेसाठी लाभ घेणार्या रूग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्या रूग्णांनी या संधीचा लाभ घेऊन दि.20 मार्च 2022 पर्यंत आपली रूग्ण रितसर नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
रितसर नावनोंदणी झाल्यानंतर दि.21 मार्च 2022 रोजी लातूर येथील स्व.विलासराव देशमुख सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल याठिकाणी जगप्रसिध्द नेञरोग तज्ञ डाॅ.तात्याराव लहाने यांच्या शुभहस्ते ही मोफत नेञ चिकित्सा आणि मोतीबिंदू शस्ञक्रिया शिबीर पार पडणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त रूग्णांनी आपली नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.