आपले नेते राज्यात ज्या पद्धतीने नेतृत्व करत आहेत, तो वेग पाहता पुढील काळात मुख्यमंत्री म्हणून वाढदिवस साजरा करू – महापौर विक्रांत गोजमगुंडे

महाराष्ट्र खाकी (लातूर) – महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्ह्यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी वेगवेगळे उपक्रम राबून लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा करत आहेत. लातूर शहर जिल्हा काँग्रेस तर्फे जिल्हास्तरीय महिला व पुरुष भजन स्पर्धेत आयोजित केली आहे या स्पर्धेच्या उदघाट्न कार्यक्रमात लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे बोलत होते. आपल्या भाषणात अनेक विषयांना आणि मुद्यांना हात घातला. या भाषणातील मुद्दे सध्या खूप चर्चेत आहेत

भाषणात बोलताना विक्रांत गोजमगुंडे म्हणालेकी या स्पर्धेच्या सुरुवात आपण पांडुरंग आणि लातूर जिल्ह्याचे विठ्ठल म्हणजे विलासराव देशमुख यांचे पूजन, नमन केले, ही स्पर्धा आयोजित करण्याचे कारण म्हणजे आपले नेते अमित देशमुख हे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत. पुढे बोलताना विक्रांत गोजमगुंडे यांनी आपल्याला भाषणात काही राजकीय चिमटे घेतले! स्टेजवर माजी दोन महापौर उपस्तित होते एक म्हणजे स्मिता खानापुरे आणि दुसरे म्हणजे दिपक सूळ आणि चालू महापौर बोलत होते.

ते बोलताना म्हणाले की माजी दोन महापौर आणि चालू महापौर उपस्तित आहेत देवाची मर्जी असेल तर नंतरही… असे म्हणाले आणि सभागृहात सर्वजण हसू लागले. पुढे बोलताना म्हणाले की एखादा नेत्याची उंची कशी ओळखावे याचा कानमंत्र ही दिला तो असा होता की एखाद्या नेत्याचे कार्यकर्ते कोणत्या पदावर आहेत त्यावरून नेत्यांची उंची ओळखवी. या स्पर्धेच्या प्रत्येक स्पर्धेकाने शेवटी अमित देशमुख यांच्या दीर्घायुष्या साठी एक तरी टाळ वाजली पाहिजे. आज हे नेतृत्व ज्या पद्धतीने राज्यात काम करत आहेत ते पाहता पांडुरंगाच्या कृपेने पुढील काळात आपण मुख्यमंत्री म्हणून वाढदिवस साजरा करू असे महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले.

पुढे बोलताना महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी टोपीचा विषय काढला आणि म्हणालेकी आज आम्ही सर्वांनी टोप्या घातल्या आहेत असे म्हणताच सर्वजण हसू लागले तेव्हा परत म्हणालेकी आम्ही सर्वांनी स्वतःच्या हाताने स्वतःला टोप्या घातल्या आहेत. आणि पुढे लगेच म्हणाले की आपल्याला आपल्या नेत्याची , नेतृत्वाची शिकवण आहे की आपण दुसऱ्याला टोप्या घालायच्या नाही असे म्हणताच सर्व सभागृहात हसण्याचा आणि टाळ्यांचा आवाज खुमला, पण आज सभागृहात आणि या आधी पण लोकांमध्ये एक चर्चा असते की महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या भाषणात विलासराव देशमुख यांच्या भाषणाची झलक दिसते.

Recent Posts