महाराष्ट्र खाकी ( आष्टी ) – नुकतेच स्थानिक स्वराज संस्था चे विधान परिषद आमदार सुरेश अण्णा धस यांच्या मातोश्री चे नुकतेच निधन झाले.
त्यानिमित्त त्यांच्या आष्टी या गावी निवासस्थानी जाऊन लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी भेट घेऊन त्यांच्या मातोश्री सुमन आक्का यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली अर्पण केली. आमदार सुरेश अण्णा धस यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी होऊन त्यांची भेट घेतली.लातूर लोकसभा चे माजी खासदार तथा विश्व दलित परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सुनील बळीराम गायकवाड,
चोकोबा ते तुकोबा वारीचे प्रमुख सचिन पाटील, जीएस निधीचे गणेश शिंदे, स्वप्नील देशमुख, विद्यार्थी परिषद चे सुनील सानप, रा.स्व.से चे बीड समन्वय प्रदीप जाधव,विद्यार्थी परिषद चे अक्षय सिरसवाल,अशोक सानप.आदी उपस्थित होते.