महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर शहरातील विविध विकासकामांसाठी लातूर शहर महानगरपालिकेने राज्य शासनाकडे पाठवलेल्या 68 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यामुळे शहरातील विकासकामांचा अनुशेष भरून निघणार आहे. लातूरच्या विकासासाठी आणि नवनवीन योजना लातूरकरांना मिळाव्यात यासाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे सतत प्रयत्न करत असतात. विक्रांत गोजमगुंडे यांच्या कार्यकाळात लातूर मनपात खूप चांगली लोकउपयीगी कामे झाली आहेत आणि सुरु आहेत. या 68 कोटी चा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला याचे सर्व श्रेय महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना आणि त्यांच्या विकासाच्या विचारांना जाते अशी शहरात चर्चा आहे.
लातूर शहराचा सर्वांगीण विकास करता यावा यासाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनात लातूर महानगरपालिकेने हा प्रस्ताव तयार केला होता. शहरातील विविध भागातील रस्ते,नाली तसेच मुख्य रस्त्यावरील दुभाजकांसह सर्व प्रभागात विकासकामे करण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
लातूर शहरातील विकास कामांसाठी 68 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याने शहराच्या विकासाचा अनुशेष भरून निघणार आहे. या 68 कोटी निधीतून शहराअंतर्गत 57 किलोमीटर रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. याशिवाय 12 किलोमीटर अंतराच्या गटारी व मुख्य रस्त्यावरील 4 किलोमीटर अंतराचे दुभाजक विकसित केले जाणार आहेत.
लातूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली असून लवकरच निधी उपलब्ध होणार आहे. लातूर महानगरपालिकेने पाठवलेल्या प्रस्तावास मान्यता देत विकासकामांना मंजुरी दिल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी राज्य शासनासह जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत.