लातूरचे मा.खा.डॉ.सुनील गायकवाड यांना “ग्रेट इंडियन”पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – लातूरचे माजी लोकप्रिय संसद रत्न खासदार डॉक्टर प्रोफेसर सुनील बळीराम गायकवाड यांना मुंबई येथे “ग्रेट इंडियन” हा पुरस्कार पद्मभूषण उदित नारायण (प्रसिद्ध गायक) आणि माज़ी ख़ासदार डॉ उदित राज यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.

16 व्या लोकसभेत उत्तम कामगिरी करून लातूर लोकसभा मतदार संघात अनेक विकासाची कामे आणि समाजातल्या शेवटच्या घटकातील माणसाला न्याय मिळेल असे अनेक कामे माज़ी ख़ासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांनी केले आहेत.प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी नीट परीक्षा सेंटर,लातूर शहरात सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल,पासपोर्ट कार्यालय,पोस्ट विभागाचे विभागीय कार्यालय ,पूर्ण लातूर लोकसभा मतदारसंघात बीएसएनएल चे 4g नेटवर्क चे जाळे,रत्नागिरी ते नागपूर हायवेची लोकसभेत मागणी,टेंभुर्णी लातूर स्टेट हायवे ला नॅशनल हायवे करून काम सुरू करण्याची मागणी .

लातूरला रेल्वेने पाणी आनने,लातूरला रेल्वे बोगीचा कारखाना सुरु केले,केंद्र सरकारच्या प्रमुख योजनेतून एक लाखापेक्षा जास्त लोकांना मोफत स्वयंपाकाचा गॅस कनेक्शन मिळऊन दिले, जिल्ह्यामध्ये जनधन बैंक खाते जास्तीत जास्त लोकाना उघडून देन्याचे काम केले.आणि विशेष म्हणजे खासदार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारची दिशा कमिटी ची नियमित बैठक घेणारे देशातले एकमेव खासदार असी नोंद असलेले,ज़िल्हा रस्ता सुरक्षा कमिटीची बैठकीची सुरुवात देशामध्ये सर्वप्रथम खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी केली आणि नियमित पाच वर्ष घेतली.लातूर आकाशवाणी साठी चा प्रयत्न आणि देशातील वेगवेगळ्या विषयावर ती जवळपास साडेसातशे प्रश्न लोकसभेत मांडून अनेक महत्त्वाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करून एक उत्कृष्ट सांसद रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहेच.राष्ट्रीय आणि अंतर राष्ट्रीय अनेक शांतता पुरस्कार मिळाले आहेत.यापूर्वी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे .

असे आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कामाची दखल घेऊन बुद्धांजलि आयुर्वेदिक लिमिटेड या कंपनी संस्थेकडून माजी खासदार डॉक्टर उदित राज यांच्या वाढदिवसानिमित्त दिला जाणारा , हा “ग्रेट इंडियन” पुरस्कार मुंबई येथे प्रसिद्ध गायक,पद्मभूषण उदित नारायण आणि डॉक्टर उदित राज त्यांच्या पत्नी मदुराईच्या चीप इन्कम टॅक्स कमिशनर सीमा उदित राज,प्रसिद्ध सिने अभिनेत्री गायिका सलमा आगा ,यांच्या हस्ते माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना ग्रेट इंडियन अवार्ड देऊन गौरव करण्यात आला.

या अवार्ड कार्यक्रमाला बॉलिवूड मधील कलाकार सिनेअभिनेते अली खान प्रसिद्ध कॉमेडियन ऍक्टर सुनील पाल प्रसिद्ध प्रसिद्ध सिने अभिनेते फैजल खान आमिर खान यांचे बंधू बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नी ची भूमिका केलेली अभिनेत्री मल्होत्रा. उदा अंजलीचे पिंपळे कैलास मासूम आणि अनेक मान्यवर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना ग्रेट इंडियन या अवार्ड गौरव केल्याबद्दल त्यांचे अनेक मान्यवर आणि मित्र परिवाराकडून अभिनंदन केले जात आहे.

Recent Posts