महाराष्ट्रातील 4 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर, लातूरचे डॉ. सुनील गायकवाड यांना ही हा पुरस्कार मिळाला असता पण !

महाराष्ट्र खाकी (विवेक जगताप ) – चेन्नईच्या प्राईम पॉईंट फाउंडेशनकडून देण्यात येणारा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. या वर्षी 11 खासदारांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या 11 खासदारांपैकी महाराष्ट्राच्या चार खासदारांचा यात समावेश आहे.

1) राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, 2) शिवसेनेचे श्रीरंग बारणे, 3) राष्ट्रवादीच्या फौजिया खान , 4) भाजपच्या हीना गावित यांना देखील संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. तर रिव्हॉलुशनरी सोशलिस्ट पक्षाचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय, काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा आणि भाजपचे खासदार विद्युत बरान महातो, सुधीर गुप्ता राज्यसभेतील बिजू जनता दलाचे खासदार अमर पटनायक, कम्युनिट पार्टीचे खासदार के. के. रागेश यांचा देखील समावेश आहे.

मागच्या लोकसभेत संसद रत्न म्हणून महाराष्ट्रातून लातूरचे खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांचा समावेश होता. ही बाब लातूरकरासाठी खूप अभिमानाची होती आणि आहे. लोकसभेत लातूर बद्दल आणि देश विकासासाठी जास्त प्रश्न विचारणारे आणि 100% उपस्तिती डॉ. सुनील गायकवाड यांची होती. या वर्षीही हा मान लातूरच्या खासदारांना मिळाला असता पण लातूर भाजपा नेतृत्वाने डॉ. सुनील गायकवाड यांना स्वतःच्या फायद्यासाठी डावलून दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली अशी चर्चा जिल्ह्यात सारखी होत असते . 16 व्या लोकसभेतील सर्वात जास्त शिक्षित खासदार म्हणून डॉ.सुनील गायकवाड यांच्या समावेश होता. लातूर भाजपा यांच्या अंतर्गत कलहामुळे आणि डॉ. सुनील गायकवाड यांच्या विरोधकांमुळे या वर्षीचा संसद रत्न पुरस्कार लातूरला मिळाला नाही याचे दुःख लातूरच्या जनते मध्ये कायम राहील हे मात्र खर.

 

 

Recent Posts