महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूरचे आणि स्वतःचे नाव आपल्या कार्यातून आणि मनमिळाऊ स्वभावातून कमावले आहे. लातूर शहर महानगरपालिकेचा महापौर म्हणून सूत्र हातात घेतल्यापासून शहरात विकास कामे, शहराची प्रगती आणि शहराची आर्थिक स्थिती सुधारली आहे यात शंका नाही. देशात स्वच्छतेमध्ये लातूर मनपाला पुरस्कार मिळाला आणि एका सामाजिक संस्थेने महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना आणि देशातील आणखी दोन मनपाच्या महापौरांना विद्यार्थ्यांसाठी शहराचा विकास या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी निवड झाली होती. या सर्व गोष्टी मुळे लातूरच्या महापौरांना पूर्ण देशात ओळख मिळाली. पण या अभिमानाच्या गोष्टीला छेद देणारी आणि एखाद्या लोकप्रतिनिधिने किती निष्काळजीपने , निवडून दिलेल्या जनतेला गृहीत धरून वागने आणि बोलने म्हणजे निवडून दिलेल्या मतदारांचा अपमान नाही का ? असा प्रश्न निर्माण होतो.
लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांना लातूरच्या जनतेने खूप अपेक्षा ठेऊन निवडून दिले. पण सुधाकर श्रृंगारे यांनी लातूरकरांचा अपेक्षा भंग केला त्याला कारणेही तशीच आहेत. कोरोना काळात सुधाकर श्रृंगारे यांनी लातूरकडे फिरवलेली पाठ लातूरकर कधीच विसरणार नाहीत ! खासदारांचा एक किस्सा सध्या लातूर जिल्ह्यात खूप चर्चेत आहे.
पंतप्रधान मोदींनी नुकतेच महाराष्ट्राची बदनामी करणारे विधान संसदेत केलं ज्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या निवासस्थानासमोर माफी मांगो मोदी सरकार आंदोलन करण्यात आले, यावेळी लातूर शहर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे बोलत होते यावेळी त्यानीं खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्याबद्दल एक प्रसंग सांगितला महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की काही दिवसापूर्वी लातूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रजासत्ताक दिनी अनेक मान्यवर आणि लोक प्रतीनिधी उपस्तित होते. यावेळी महापौर हे खासदारांना भेटले आणि काही बोलून निघाले नंतर खासदारानी कमाल केली खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी बाजूच्या माणसाला विचारले की हे कोण होते. असा किस्सा महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आपल्या भाषणात सांगितला. या गोष्टीतून खासदार सुधाकर श्रृंगारे यांचा आपल्या मतदारसंघाबद्दलचा अभ्यास, किंवा जनतेबद्दल किती काळजी, जिम्मेदारी आहे हे दिसून येते. का मग यातून खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी राजकीय द्वेष दाखवला ? का खासदारकीचा घमंड ?
सुधाकर श्रृंगारे यांनी काय म्हणून हे केले त्यानाच माहिती असावे पण या गोष्टीतून जनतेने आपला लोकप्रतिनिधी कसा असावा या बद्दल चांगलाच बोध घेतला असावा !