आमदार अभिमन्यू पवार यांच्या जनता दरबारला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र खाकी (औसा) – लातूर जिल्ह्यातील आमदारापैकी औशाचे आमदार हे सर्वात क्रियाशील आणि जनतेला जास्त वेळ देणारे आमदार आहेत असे त्यांच्या कार्यातून दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची झलक असलेले अभिमन्यू पवार यांनी आपल्या कार्यातून आणि मेहनतीने लोकांच्या मानत जागा निर्माण केली आहे. औसा तालुक्यातील नागरिकांचे रखडलेले प्रश्न/कामे मार्गी लावण्यासाठी तहसील कार्यालय औसा येथे सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित केला होता. सकाळी 11 वा सुरु झालेला जनता दरबार सायंकाळी सुमारे 5 वा संपला. जवळपास 6 तास चाललेल्या या मॅरेथॉन जनता दरबारात शेकडो शेतकऱ्यांनी, नागरिकांनी उपस्थित राहून त्यांच्या पीकविमा, महावितरण, कृषी, महसूल, जलसंधारण, पाणीपुरवठा, मनरेगा, शिक्षण, भूमिअभिलेख, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांशी निगडित समस्या मांडल्या. नागरिकांनी मांडलेले बहुतांश प्रश्न/विषय जागेवरच मार्गी लावले तर उर्वरित प्रश्न/विषय कालबद्धपणे मार्गी लावण्याच्या सूचना आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

औसा मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना गोठा, शेततळे, सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प असे लाभ देऊन त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी मी ‘मनरेगातून ग्रामसमृद्धी’ या अभियानावर आमदार अभिमन्यू पवार काम करत आहेत . याच प्रयत्नांचा भाग म्हणून या जनता दरबारात एकाच दिवशी औसा तालुक्यातील 300 लाभार्थी शेतकऱ्यांना गोठा मंजुरीचे पत्र प्रातिनिधिक स्वरूपात आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते वितिरित करण्यात आले . औसा मतदारसंघात आमदार अभिमन्यू पवार यांचे हजारो गोठे बांधण्याचं उद्दिष्ट आहे पण त्यात कुशल-अकुशल चे प्रमाण ही अडचण ठरत असून त्यात सुधारणा व्हावी यासाठी आमदार अभिमन्यू पवार शासनस्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहेत . कुशल-अकुशल चे प्रमाण सुधारले की गोठ्यांची संख्या शेकडोवरून हजारोत जाईल असा विश्वास अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला . यावेळी काही कुटुंबांना शिधा पत्रिकाही अभिमन्यू पवार यांच्या हस्ते वितरित केल्या.

या जनता दरबाराला उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी,औसा नगरपरिषद मुख्य अधिकारी श्रीमती वसुधाताई फड, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे,नायब तहसीलदार कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर. आर.शेख, महावितरणचे अभियंता जाधव, यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे