पाच राज्यातील निवडणुकी डोळ्यासमोर ठेऊन या अर्थसांकल्पात केवळ घोषणांचा पाऊस पडल्याचे दिसून येत आहे – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

महाराष्ट्र खाकी (लातूर) – या वर्षीच्या अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला. या अर्थसांकल्पा बाबत प्रत्येक नेत्याने प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संस्कृतीक कार्य मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी एक पोस्ट करत या अर्थसांकल्पा वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना महामारीमूळे देशात निर्माण झालेली बेकारीची समस्या, वाढत्या महागाईमुळे बेजार झालेली गरीब आणि मध्यमवर्गीय जनता, त्याचबरोबर आयकरात सूट मिळेल म्हणून अपेक्षा ठेवून असलेला नोकरदार वर्ग, या सर्व घटकांकडे साफ दुर्लक्ष करीत आगामी काळात 5 राज्यात होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना केवळ घोषणांचा पाऊस पाडला आहे.

कोरोना महामारीने अनेक उद्योग व्यवसाय बंद पडल्यामुळे असंख्य लोक बेरोजगार झाले आहेत, याच कारणामुळे लहान उद्योग व्यावसायिकांचे उत्पन्न कमी झाले आहे, त्यामुळे दैनंदिन गरजा भागवणेही त्यांना अवघड झाले आहे. दुर्दैवाने नेमक्या याच वेळी महागाईने उच्चांक गाठला आहे, या परिस्थितीत उद्योग व्यवसायिकांना दिलासा देऊन रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे अपेक्षित असताना, अर्थमंत्र्यांनी या विषयाकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेती विकासासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल असे धोरण आखलेलले दिसत नाही.

एकंदरीत अर्थसंकल्पाचा विचार करता आगामी काळात होऊ घातलेल्या ५ राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीतील भाषणा प्रमाणे अर्थसंकल्प सादर करताना केवळ घोषणांचा पाऊस पडल्याचे दिसून येत आहे, मागच्या वर्षी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांचे पुढे काय झाले याचा आढावा न देता आणखी नव्या घोषणांची त्यात भर पडल्याचे स्पष्टपणाने दिसून येत आहे.

 

Recent Posts