महाराष्ट्र

मा. खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी घेतली पालक मंत्री अमित देशमुख यांची भेट

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर चे लोकप्रिय माजी खासदार संसद रत्न प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लातूर चे पालकमंत्री अमित देशमुख यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.लातूर हे शैक्षणिक हब असलेले ठिकाण आहे. त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी अत्याधुनिक सेंट्रल लायब्ररी तयार करावी, छत्रपती शिवाजी महाराज चौकात बस डेपो च्या पश्चिम दिशेस असलेल्या खाडी मध्ये एक हजार बैठक व्यवस्था असलेले वातानुकुलित नाट्यगृह किंवा सभागृह बांधावे,

लातूर च्या विमान तळावर नाईट लँडिंग ची सोय करावी अशा मागण्याचे निवेदन माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लेखी निवेदाद्वारे केली आहे. माननीय पालक मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा केली. लातूर जिल्ह्यातील प्रलंबित राहिलेले अनेक सरकारी कामे पूर्ण करावीत अशी ही विनंती माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी केली आहे. माननीय पालकमंत्री यांच्या दोन वर्षाचा कालावधी चांगलं काम करून पूर्ण केल्याबद्दल सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लोकहिताच्या कामाची मागणी करून सध्या जरी खासदार नसले तरी ही लोकप्रतिनधींनी लोकांसाठी काम केले पाहिजे असे उदाहरण त्यांच्या या भेटी मुळे लोकांना लोकप्रिनिधींना दिले आहे. सत्ता कुणाचीही असो जनतेच्या विकासाची कामे झाली पाहिजेत हेच या भेटीतून जनतेला संदेश दिला आहे.

Most Popular

To Top