महाराष्ट्र

लातूर शहरात 15 ते 18 वर्ष वयोगटातील लसीकरणासाठी 14 नवीन केंद्र स्थापन

 

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – केंद्रशासनाच्‍या मार्गदर्शक सुचनानुसार दि. 03 जानेवारी 2022 पासून 15 ते 18वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण चालू करण्‍यात येत आहे. लातूर शहरात इयत्‍ता 10 वी ते 12 वी तील विवीध शाळा/ महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांची संख्‍या 33 हजार 477 एवढी आहे. तरी 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुला–मुलींच्‍या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणासाठी शहरातील कांही प्रमुख महाविद्यालय/ विद्यालय येथे लसीकरण केंद्र स्‍थापन करण्‍यात येत आहेत.

राजश्री शाहु महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, बसवेश्वर महाविद्यालय, सोनवणे महाविद्यालय, त्रिपुरा महाविद्यालय, सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, जयक्रांती महाविद्यालय, केशवराज विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय, यशवंत विद्यालय,गोदावरी देवी कन्या विद्यालय, राजस्थान हाय स्कुल, पोतदार स्कुल व झी मांऊट लिटेरा स्कूल.

सर्व संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यालयाचे मुख्‍याध्‍यापक यांना सूचित करण्यात आलेले आहे. तरी संबधीत महाविद्यालयाच्‍या/ विद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी ऑनलाईल बुकींग न करता आपल्‍या महाविद्यालय/ विद्यालयातील लसीकरण केंद्र येथेच लस घ्‍यावी. यासाठी आपल्‍या महाविद्यालयाशी संपर्क करावा.
तसेच इतर महाविद्यालय/ विद्यालयामध्‍ये देखील लसीकरण केंद्र चालू करण्‍यात येणार आहेत.

त्‍याबाबत त्‍या -त्‍या महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यालयाचे मुख्‍याध्‍यापक यांना तारीख कळविण्‍यात येईल. त्‍यामुळे 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्‍यांनी शहरातील इतर लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. गर्दी केल्‍या मुळे कोरोना संसर्ग होण्‍याची शक्‍यता नाकारता येणार नाही.
तरी विद्यार्थ्‍यांनी इतर केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी न करता आपल्‍या विद्यालय/ महाविद्यालय यातील लसीकरण केंद्र येथेच लसीकरण करून घ्‍यावे, असे उपायुक्त लातूर महानगरपालिका यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Most Popular

To Top