महाराष्ट्र

Health Supplements मुबंई (बोरिवली पश्चिम) अन्न व औषध प्रशासनच्या कारवाईत कमी दर्जाचा फूड सप्लिमेंट साठा जप्त

महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) –  अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत अन्न सुरक्षा कायद्यांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने कमी दर्जाचे फूड सप्लिमेंट साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन, दक्षता व गुप्तवार्ता विभागास प्राप्त माहितीनुसार मेसर्स सिग्मा लाइफसायन्स, बंगलो भूखंड क्रमांक- 204-244, आरएससी- 41, गोराई 2, प्रगती शाळेसमोर, बोरिवली पश्चिम, मुंबई- 400092 या पेढीची ऑनलाईन तपासणी केली असता तेथे Health Supplements चे उत्पादन होत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी Health Supplement 100% Whey Protein(Ammolabz) व Dietary Supplement Progenix Mass Addict चा उत्पादित करून ठेवलेला साठा आढळून आला.

या ठिकाणी Health Supplement 100% Whey Protein(Ammolabz) व Dietary Supplement Progenix Mass Addict चे अन्न नमुने घेवून Health Supplement 100% Whey Protein (Ammolabz) ह्या अन्नपदार्थाचा उर्वरित 76 जार (कंटेनर), 5,75,320/- रुपये चा साठा तर Dietary Supplement Progenix Mass Addict ह्या अन्नपदार्थाचा उर्वरित 100 जार (कंटेनर), 1,45,000/- रुपये चा साठा हा काही घटकांचे प्रमाण हे RDA पेक्षा जास्त असल्याने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असल्यामुळे तसेच साठा कमीदर्जाचा असल्याच्या संशयावरून व जन आरोग्य हितार्थ जप्त करण्यात आला.

अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल प्रलंबित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. ही कारवाई  अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आली असल्याचे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने कळविले आहे.

Most Popular

To Top