देश

धिरज देशमुखांनी अभिनेते रितेश देशमुख यांच्या यशाचे कौतुक करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर चे नाव राजकारणात आणि चित्रपट सृष्टीत गाजवणारे देशमुख परिवार आहे. लातूरला हा मान दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि बॉलिवूड मधील यशस्वी नायक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे रितेश देशमुख यांच्या मुळे मिळाला आहे. तस पाहिलतर देशमुख कुटुंबियांची गोष्टच निराळी आहे अस म्हणावं लागेल आणि त्यांच्या कडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

 

राजकारणाची कुठलीही मोठी पार्श्वभूमी नसताना विलासराव देशमुख यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा रितेश देशमुख यांनी कुठलीही पार्श्वभूमी नसताना अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हे उल्लेखनीय धाडस म्हणावे लागेल. आज अभिनेता रितेश देशमुख यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने त्यानां त्यांच्या लहान भावाने म्हणजे लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी रितेश देशमुख यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

धिरज देशमुख यांच्या रितेश देशमुख यांना शुभेच्छा

दादा,
अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना एक नवं आव्हान आपण स्वीकारलं आणि त्यात यश मिळवलं. जनतेनंही आपल्यावर भरभरून प्रेम केलं. आपल्याला आशीर्वाद दिला. उत्कृष्ट अभिनेता ही ओळख दिली. आपल्याला सतत नाविन्याचा ध्यास असतो. यामुळेच हे शक्य झाले. आपल्यातील हे नाविन्याचं वेड आणि माझा पाठीराखा ही आपली भूमिका अशीच सदैव कायम राहो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

दादा, आपल्याला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!

देशमुख परिवारातील बंधू प्रेम सर्वांसाठी एक आदर्श ठरेल मग ते विलासराव देशमुख आणि दिलीपराव देशमुख यांच्यातील असो वा अमित देशमुख, रितेश देशमुख आणि धिरज देशमुख यांच्यातील असो.

 

Most Popular

To Top