सहाय्यक पोलीस अधीक्षक ips निकेतन कदम यांनी आष्टा मोहदळ खून प्रकरणातील आरोपीना 12 तासात पकडले

 

महाराष्ट्र खाकी (चाकूर) – लातूर जिल्हा तसा शांत जिल्हा म्हणून ओळखला जातो पण अलीकडच्या काळात जिल्ह्यात गुन्हेगारी काही प्रमाणात वाढत होती पण लातूर जिल्ह्याला तिन ips अधिकारी मिळाले आणि जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले. या तिन ips अधिकाऱ्यातील एक अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या धडाकेबाज कारवाया जिल्ह्याने पाहिल्या आहेत. निकेतन कदम यांच्या कारवायामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैद्या धंदे चालवणाऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. कुठल्याही गुन्ह्याचा तपास एका विशिष्ट पद्धतीने करून गुन्ह्यांची

उकल करत गुन्हेगारांना तुरुंगाची हवा खाऊ घालणारे सहाय्यक पोलीस अधीक्षक ips निकेतन कदम यांनी एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीना फक्त 12 तासात पकडले आणि गुन्ह्यांची उकल केली आहे . लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आष्टा मोहदळ येथे 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या आसपास एका पुरुषाचा मृतदेह सापडला होता. याची माहिती मिळताच चाकूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यानंतर तपासासाठी एक पथक नेमण्यात आले होते . पोलीस तपासामध्ये सदर मृतदेह हा चाकूर येथील हनुमंत व्यंकट

येवरे वय – 40 यांचा असल्याचा स्पष्ट झाले . हनुमंत येवरे यांचे एका महिलेची अनैतिक संबंध होते. हि महिला आपल्या पतीपासून विभक्त रहात होती. हनुमंत येवरे हा या महिलेवर देहविक्रीसाठी दबाव टाकत होता आणि मारहाण करत होता. या जाचाला कंटाळून या महिलेने त्याला जीवे मारण्याचा कट रचला आणि 12 डिसेंबर 2021 रोजी हनुमंत येवरे याला या महिलेने एका निर्जन जागी बोलावले आणि साथीदारांच्या मदतीने लोखंडी रोडने मारहाण करून त्याचा खून केला.

पोलिसांनी या खुनाच्या आरोपात संतोष धोंडीराम घाडगे वय – 25, रा. शिवनखेड ता. चाकूर जि. लातूर लक्ष्मण बब्रुवान डांगे वय – 38, रा. आष्टा ता. चाकूर जि. लातूर आणि महिलेला अटक केली. खुना बद्दल विचारपूस केली असता महिलेच्या सांगण्यावरून हनुमंत येवरे यांना लोखंडी रॉडने डोक्यात मारून खून केल्याचे कबूली केली. यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात कलम 302, 201, 34, 120(ब) भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक बालाजी

मोहिते यांनी केला असून पुढील तपास सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम हे करीत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी,चाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते,पोलीस उपनिरीक्षक सुभाष
सूर्यवंशी,पोलीस अमलदार पिराजी पुठेवाड,हनुमंत मस्के, बाळू अरदवाड,सुकेश केंद्रे,दामोदर शिरसाट,महिला पोलीस अमलदार पुनम शेटे यांनी पार पाडली.

Recent Posts